🔥गेम पार्लर चालवणाऱ्या कडून एकूण मुद्देमाल १,४४,५७० जप्त करण्यात आला.
हिंगणगाट.-/पोलीस स्टेशन येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे 11 जानेवारी रोजी पोलिस ठाणे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की,सरकारी दवाखाना चौकातील अथर्व भोजनालायाचे बाजूला टीनाचे शटरचे दुकानात इलेक्ट्राणिक कॉइन मशीन वर चाबीचा वापर करून मशीनवर नमूद असलेल्या नंबरवर पैशाचा हार जितचा खेळ करून विविध आकडे वर पैसे लाऊन हार जितचा जुगार खेळत आहे.अशा विश्वासनिय गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांनां माहिती देऊन प्रभारी ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात खबरे प्रमाणे गेम पार्लरवर पंच व पो स्टाफ सह रेड केला असता यातील आरोपी चेतन अंकुश कोहाड वय 19 वर्ष रा. संत चोकोबा वॉर्ड, हिंगणघाट हा वैभव फुलझेले रा फुकटा ता. हिंगणघाट याचे सांगण्यावरून इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लर वर मशीन वरील जुगार खेळ 1) साहिल धनराज लोखंडे 2) अतिश विनायक सातपुते 3) नितीन श्रीराम ढोक 4) दीपक विष्णुपंत वाघमारे यांना खेळवीत असताना रंगेहात मिळून आल्याने त्याचे ताब्यातून 1) वेगवेगळ्या कंपनीच्या 05 इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन कीं 1,25,000 रू. 2)इलेक्ट्रॉनिक कॉइन मशीन चालवणाऱ्या
चालकाच्या अंगझडतीत जुगार खेळाचे नगदी 3250/-रू.3) एक निळ्या रंगाचा ओपो कंपनीचा मोबाईल की 15,000/-रू 4) 03 नग स्टूल की 600/-रू 5) 04 आरोपीचे अंगझतीत 750/- रू. असा एकूण जु कीं 1,44,570 /-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पोलीस स्टेशन हिंगनघाट येथे आरोपीता विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे .ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलीस अधीक्षक डाँ.सागर कुमार कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत,सा. यांचे निर्देशानुसार.मनोज गभने, पोलीस निरीक्षक सा. हिंगणघाट व प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे अधिकारी सपोनि अनिल आळंदे, पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे,आशिष नेवारे, विजय काळे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.