हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकावर येलो मोझँक रोगांचा प्रादुर्भाव…पिकांचे सर्वे करून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये त्वरित नुकसान भरपाई द्या..राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी…
जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदन
हिंगणघाट :- हिंगणघाट-समुद्रपूर- सिंदी रेल्वे तालुक्यामध्ये सोयाबीन पिकांवर आलेल्या “येलो मोझॅक (वायरस)” या रोगाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.सोयाबीन पिकावर आलेल्या रोगावर कृषि अधिकारी यांनी त्यांचे सर्व्हे मधून सदर पिकांवर “येलो मोझॅक (वायरस)” रोगाने सोयाबीन शेंगा पूर्णतः भरण्याआधीच पाने पिवळी होऊन शेंगा कमी प्रमाणात लागून त्या शेंगांमध्ये कुठल्याही प्रकारचा दाणा भरला नसून सोयाबीन पिक हे संपूर्णत:उद्धवस्त झालेले आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पिके घेतली जातात यावर्षी चांगला पाऊस पडल्याने पिक हे जोरदारपणे निघाले व पिकाची योग्य प्रमाणात वाढ सुद्धा झाली.आता सोयाबीन पिकाला फुले व शेगां पकडण्याचा कालावधी सुरु असतांना याच कालावधीत पीक पिवळे पडून भाजल्यासारखे दिसू लागले आहे. हिरवेगार दिसणारे पीक एकाएकी भाजल्यासारखे दिसू लागल्याने शेतकऱ्यांवर फार मोठा मानसिक आघात झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात बी-बियाणे, रासायनिक खते,मशागत, मजूरी यावर लाखो रुपये खर्च करण्यात आल्याने शेतकरी आधीच डबघाईस आला आहे. दिवाळीत पीक हाती येईल आणि देणेकऱ्यांचे देणे फेडू असे स्वप्न शेतकऱ्यांनी पाहिले होते. या परिस्थितीत शेतकरी हा हवालदिल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोडांशी आलेला घास या अतीवृष्टीमुळे हिरावून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तरी आपण शासनस्तरावर झालेल्या सोयाबिन पिकाच्या नुकसानाचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पिक विमा काढलेला आहे त्यांचे सरसकट सर्वेक्षण करुन त्यांना पिक विमा लवकरात लवकर मिळवून द्यावा. अशी मागणी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण शेतकरी बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करीत आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोंटिंग,माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर,अशोकबाबू कलोडे,सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, प्रा.अशोक कलोडे,वसंतराव सिरसे, मोहनराव अंबोरे,प्रा.प्रभाकर कलोडे, रा.यु.शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील शेंडे,दिनेश घोडमारे,अफजल बेरा,गुड्डू कुरेशी,बंटी बेलखोडे, जगदीश बोरकर,हेमराज झाडे, सौ.रुपेशा झाडे,भारत हिवंज,रवी राणाजी, प्रमोद झाडे, विजय मुडे, लक्ष्मण झाडे,शरद झाडे,गणेश मसराम,राहुल तमगिरे,रामाजी घनवटे,गजानन डंभारे मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.
सहासिक न्यूज-24वर्धा