हिंगणघाट शहरात मध्यरात्रीदरम्यान २ चोरीच्या घटना.
हिंगणघाट : शहरातील दोन व्यावसायिक व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये चोरीच्या दोन घटना घडल्या असून अज्ञात चोरांनी १२ हजारांची रकम लंपास केली.
शहरातील बिडकर महाविद्यालयासमोरील कापसे मशिनरीज या व्यावसायिक प्रतिष्ठानात चोरटयांनी रात्री ३.१५ चे दरम्यान दुकानाचे कुलुप तोडून दुकानामध्ये ठेऊन असलेली ९ हजार रुपयांची रोख रक्कम पळविली. आरोपीचा हा प्रकार सिसीटीवीमध्ये कैद झाला असून दुकान संचालक सचिन कापसे यांनी हिंगणघाट पोलिसांत तक्रार दाखल केली.
याच रात्री १ वाजता शहरातील मरोठी हॉस्पिटल येथील औषधी दुकानसुध्दा फोडण्यात आले, या दुकानातून एकुण ३ हजार रूपये अज्ञात चोरट्याने लांबविले आहे.
अलीकडच्या काळात शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसत असून अशा अनेक प्रकरणामध्ये पोलिसांना आरोपी गवसत नाही.
वाढत्या चोरीच्या घटनांमधे सतत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना व्यक्त होत आहे.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंगणघाट