हिंदी विश्‍वविद्यालयाचे माजी वित्ताधिकारी गवई यांना श्रद्धांजली

0

साहसिक न्युज24
प्रतिनिधी/ वर्धा:
महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयाचे माजी वित्त अधिकारी श्री संजय भास्‍कर गवई (वय 70 वर्ष) यांच्या निधनानिमित्त विश्‍वविद्यालयाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. श्री गवई यांचे शनिवार 15 रोजी पुणे येथे देहावसान झाले. त्यांचा जन्‍म 17 ऑगस्ट, 1952 रोजी झाला होता. श्रद्धांजलि अर्पित करतांना कुलगुरु प्रो. रजनीश कुमार शुक्‍ल म्हणाले की विश्‍वविद्यालयाच्या उभारणीत श्री गवई यांचे महत्वाचे योगदान होते. त्यांच्या निधनाने विश्वविद्यालय परिवार शोकाकुल आहे.
श्री संजय गवई 20 ऑक्टोबर 2011 मध्ये वित्ताधिकारीपदी रुजू झाले. त्यांनी 01 मार्च ते 28 मार्च 2014 व 21 नवंबर, 2014 ते 03 जून, 2015 पर्यंत कार्यकारी कुलसचिव पदही सांभाळले. ते 31 जुलै 2015 रोजी वित्ताधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांनी पुणे व नागपुर विद्यापीठात वित्त व लेखा अधिकारी म्हणून काम केले. ते बँक ऑफ इंडियाच्या मुबंई शाखेत मॅनेजर होते. महाराष्‍ट्र सरकारच्या वित्त मंत्रालयात प्रोबेशनरी अधिकारी व भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयात त्यांनी छत्‍तीसगड राज्‍याचे राष्‍ट्रीय स्‍तरावरील मॉनिटर म्हणून कार्य केले. ते नागपूर विद्यापीठातील एल.एल.बी, एल.एल.एम व एम.बी.ए चे अध्यापकही होते. त्यांना विपणन, वित्त, कायदा व प्रशासनाचा 40 वर्षाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या मागे पत्‍नी माधुरी, दोन मुली केतकी व राजश्री सह मोठा आप्त परिवार आहे. ते एक उत्कृष्ट हारमोनियम वादक होते. ते मागील सहा महिन्यापासून आजारी होते. ऑनलाइन शोकसभेत शैक्षणिक, गैर-शैक्षणिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!