अवैध मुरूम वाहतूक करताना टिप्पर जप्त.
हिंगणघाट : गिरड/समुद्रपूर,रस्ता आणि इमारतीचे बांधकाम मातीशिवाय पूर्ण होत नाही. शासकीय व खाजगी बांधकामात मुरुमचा वापर रोज मोठ्या प्रमाणात होत आहे.मुरूम उत्खननासाठी मोठी यंत्रणा असून यामध्ये जेसीबी,डंपर यांचा समावेश असून रॉयल्टी मात्र महिन्याला नाममात्र ब्रासची यासाठी तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी पावतीवर मालाची वाहतूक, वेळेचे बंधन यासर्व बाबीचा समावेश करणे बंधनकारक आहे तरी बेकायदा खाणींच्या आधारेच मुरूम पुरवठा केला जात आहे.समुद्रपूर तहसील परिसरात मुरूम केवळ नावावर रॉयल्टी भरून हजारो ब्रास मुरूम चोरला जात आहे.समुद्रपूर तालुक्यांतील मौजा जाम येथे शुक्रवारी संध्याकाळी विनापरवाना अवैध मुरूम वाहतूक करताना टिप्पर क्रमांक एम एच,४०, एन ५७७७ ड्रायव्हर धनराज दौलतराव बरडे गाडी मालक सुनिल डोंगरे आढळले असता नायब तहसीलदार शाम कावटी मंडळ अधिकारी डेहनकर तलाठी वानखेडे यांनी मुरूम वाहतूक करत असलेल्या टिप्परची थांबवून चौकशी केली असता अंदाजे २ ब्रास मुरूम वाहतूक करण्याचा कुठलाही परवाना नसल्याचे आढळून आले टिप्परला जप्त करून समुद्रपूर तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे कारवाही महसूल विभागातर्फे करण्यात आली आहे पुढील कारवाई सुरू आहे या कारवाईमुळे समुद्रपूर तालुक्यातील अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24