​”आमदार सुमित वानखेडे हे पक्ष शिस्तीने काम करणारे नेतृत्व” : जिल्हाध्यक्ष संजय गाते 

0

🔥​“आमदार सुमित वानखेडे हे पक्ष शिस्तीने काम करणारे नेतृत्व” : जिल्हाध्यक्ष संजय गाते 

🔥​”कार्यकर्त्यांसाठी हक्काचे व्यासपीठ आणि जनतेसाठी सुविधा केंद्र” : आमदार सुमित वानखेडे.

🔥आर्वीत भाजपच्या नवीन जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन

आर्वी -/ भारतीय जनता पार्टी, आर्वी शहर व ग्रामीणच्या नवीन भव्य कार्यालयाचा उद्घाटन समारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात व भव्य वातावरणात संपन्न झाला. हे नवीन कार्यालय पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी, पक्षाच्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला संपर्क अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी एक मुख्य केंद्र म्हणून कार्य करणार आहे.

 सोहळ्याचे उद्घाटन भाजपा जियाल्हाध्यक्ष संजय गाते, वसंतराव गुल्हाने, नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने, अनिल जोशी, अरुण गेडाम आणि छत्रपती बोके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तसेच या प्रसंगी आर्वी विधानसभा प्रमुख विजय वाजपेयी, ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र ठाकरे आणि शहर अध्यक्ष राहुल गोडबोले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला भाजपचे आर्वी शहर व आर्वी ग्रामीण पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी प्रचंड संख्येने हजेरी लावली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “सामान्यतः इतर पक्षांचे आमदार किंवा खासदार निवडून आल्यानंतर केवळ स्वतःचाच विचार करतात आणि त्यांचे वैयक्तिक कार्यालय हेच पक्षाचे कार्यालय बनून राहते. परंतु, आमदार सुमित वानखेडे यांनी कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढावे आणि पक्षाचा विस्तार व्हावा यासाठी आष्टी, कारंजा आणि आता आर्वी येथे सर्वसामान्यांना सहज पोहोचता येईल अशा मध्यवर्ती ठिकाणी स्वतंत्र कार्यालये सुरू केली आहेत. या कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय विभागांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते सदैव तत्पर राहतील.”

यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले की, “या कार्यालयाच्या रूपाने कार्यकर्त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. नागरिकांच्या दैनंदिन आणि कार्यालयीन कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींचे जागेवरच निराकरण करण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यालयात नियमित उपलब्ध असतील. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार, प्रसार आणि त्यांची तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे कार्यालय मार्गदर्शक ठरेल.”

या सोहळ्यामुळे आर्वी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक नवा जोश आणि नवचैतन्य पाहायला मिळाले.

         राजू डोंगरे साहसिक        News-/24 आर्वी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!