श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे नागपुर अमरावती महामार्गावरील वाडी उड्डानपुलाला ‘श्री संताजी जगनाडे महाराज ‘नांव अधिकृत करण्याबाबत नरेश चरडे नगराध्यक्ष नगर परिषद वाडी यांना निवेदन देण्यात आले.
🔥श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे नागपुर अमरावती महामार्गावरील वाडी उड्डानपुलाला ‘श्री संताजी जगनाडे महाराज ‘नांव अधिकृत करण्याबाबत नरेश चरडे नगराध्यक्ष नगर परिषद वाडी यांना निवेदन देण्यात आले.
नागपूर -/ वाडीतील नागपुर अमरावती महामार्गावरील उड्डानपुलाला ‘श्री संताजी जगनाडे महाराज’ नांव देण्यास नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचे ॲप्रुवल पत्र संघटनेला मिळाले आहे.चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा यांनी सुद्धा ‘श्री संताजी जगनाडे महाराज ‘यांचे नांव देण्यास अनुकूलता दर्शवली. तसे संघटनेच्या निवेदनावरती लिखीत रिमार्क करून दिले.हिंगणा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार समीर मेघे यांनी मौखिक मान्यता दिली.वारंवार नॅशनल हायवे ओथोरीटि,बांधकाम कार्यालय महाराष्ट्र राज्य,पालकमंत्री नागपूर जिल्हा, केंद्रीय मंत्री,आमदार यांना निवेदने दिली,तरीपण श्री संताजी जगनाडे महाराज उड्डाणपूल वाडी नागपूर ला नांव देण्यास का बरं दिरंगाई होत आहे याबाद्दल वाडीतील वारकरी संप्रदाय तथा तेली समाजात असंतोषाची भावना आहे.याबद्दल नगराध्यक्ष यांनी योग्य तो निर्णय घेऊन वाडी परीसरातील वारकरी संप्रदाय तथा तेली समाजाला न्याय द्यावा.यासोबत या अगोदर दिलेले निवेदनाची संलग्नित पत्रे तथा नितीन गडकरी केंद्रीय मंत्री भारत सरकार यांचे ॲप्रुवल पत्र जोडत आहोत.कृपया श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे दिलेल्या निवेदनाला सकारात्मक स्विकारून योग्य ती प्रशासनिक कार्यवाही करून ‘श्री संताजी जगनाडे महाराज ‘यांचे नाव वाडी उड्डाणपूलाला अधिकृत करावे अशी मागणी करीत आहोत.चार ते पांच वर्षांपासून या मागणी साठी सातत्याने संघटनेचे द्वारे निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत.योग्य तो निर्णय घेऊन ‘श्री संताजी जगनाडे महाराज ‘यांचे नांव अधिकृत करावे अशी अपेक्षा करतो.तसेच सोबतच प्रती कॉपी – देवेंद्र फडवणिस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,नितीन गडकरी,
चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री नागपूर जिल्हा,समीर मेघे आमदार हिंगणा यांना स्मरण पत्र म्हणून निवेदन देऊ असे संघटनेचे दिपक अवचट वरीष्ठ सल्लागार यांनी नगरअध्यक्ष यांना सांगितले.नगराध्यक्ष यांनी पुढील कारवाई साठी पत्र नागपूर जिल्हाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवुन यावर लगेच तोडगा काढु असे आश्वस्त केले.उपस्थित पदाधिकारी अनिल बजाईत प्रदेशाध्यक्ष,अनिल दहाघाणे जिल्हाध्यक्ष,रोशन वैद्य उमेश साहु उपाध्यक्ष वाडी शहर,सचिन लिचडे सचिव वाडी शहर,मोतीराम शहारे,सुरेश बारई,संजय जिवनकर, पुरुषोत्तम लाकडे,संजय साहू,ई उपस्थित होते.