आय सी आय सी आय फाऊंडेशनच्या माध्यमातून कुकूट पालन व्यवसाय करिता कावेरी जातींचे पक्षी वितरण.

वर्धा : जिल्ह्य़ात सेलू,समुद्रपुर, कारंजा तालुक्यातील ग्रामीण समुदायातील,शेतकरी,महिला, भूमिहीन यांच्या करिता उपजीविका,संसाधन यावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.फाऊंडेशन च्या माध्यमातून नावीन्य पूर्ण उपक्रम,दुग्ध व्यवसाय करिता चारा लागवड नालाखोलीकरन, चेकडॅम.,रेनवाॅटर हार्वेस्टिंग फळबाग लागवड ई. उपक्रम राबविण्यात येत आहे फाऊंडेशनच्या माध्यमातून दिनांक 3 जानेवारी 2024 या रोजी समुद्रपूर तालुक्यातील देरडा,जेजुरी,आष्टा ,बावापुर ,सेलु तालुक्यातील पळसगाव बाई, कोटंबा, जयपुर,शिवनगाव,सोंडी,सालई कला,कारंजा तालुक्यातील कन्नमवार भिवापूर,या गावातील आदिवासी ,भूमिहीन विधवा 150 कुटुंबियांना यांना 3000 कावेरी जातींचे पक्षि, खाद्य वितरण करण्यात आले या प्रसंगी आय सीआय सी आय फाउंडेशन चे वर्धा जिल्ह्य़ाचे विकास अधिकारी मनीष खेडकर सर ,सेलु तालुक्यातील नरेश बानेवार, आदिनाथ खानपट्टे, समुद्रपुर तालुक्याचे चेतन वावरे ,कारजा तालुक्यातील निलेश , गावातील सरपंच, सदस्य,महिला,गावकरी उपस्थीत होते .
सागर झोरे साहसिक न्यूज-24
