आर्वीत शहरात भाजपच्या वतीने 370 फूटाची तिरंगा रॅली
Byसाहसिक न्यूज24
प्रतिनिधी/ आर्वी:
आझादी का अमृत महोत्सवाच्या हर घर तिरंगा निमित्त वर्ध्यातील आर्वी शहरात आज भाजपच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली…जम्मू काश्मीर मध्ये 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर आमदार दादाराव केचे यांनी तिरंगा रॅली मध्ये तिरंगा 370 फूट लांबीचा तयार करून या तिरंगा झेंड्याची संपूर्ण शहरात रॅलीसह ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली…यावेळी आमदार दादाराव केचे यांच्या उपस्थितीत हजारो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते..