🔥यशवंत कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे करियर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.
देवळी,भिडी -/ यशवंत कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे दिनांक 20 एप्रिल रोजी दहावी बारावीनंतर कोणते क्षेत्र निवडावे या संबंधित करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेंच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अनिल ढांगे यांची उपस्थिती होती.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अरविंद राठोड कार्यशाळेचे आयोजक प्रा राजेश जोगळे इत्यादी उपस्थित होते.
सर्वप्रथम यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय दाआजी उपाख्य बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली दहावी आणि बारावीनंतर आपण कोणते क्षेत्र निवडावे,? कोणत्या क्षेत्राकडे करिअरच्या अधिक वाटा आहे या संबंधित सखोल मार्गदर्शन करताना प्रा. अरविंद राठोड यांनी म्हटले की कला शाखेतील करिअरच्या संधी कोणत्या प्रशासकीय क्षेत्रे एमपीएससी ,पीएसआय, मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, तहसीलदार, गटविकास अधिकारी ,शिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी, उपशिक्षणाधिकारी ,पोलीस इत्यादी .ग्रामीण विकास क्षेत्र ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक शिक्षण क्षेत्र प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक कायदे तज्ञ एल एल बी, एल एल एम, न्यायाधीश पत्रकारिता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, नेटवर्किंग पत्रकार निवेदक ,बँकिंग आणि मॅनेजमेंट समाजकार्य बीएसडब्ल्यू, एम एस डब्ल्यू शासकीय निम शासकीय समाज कार्यकर्ता कला पर्यटन कम्प्युटर सॉफ्टवेअर क्षेत्र बीसीए, एमसीए खाजगी एनजीओ अशा अनेक क्षेत्रात संधी असल्याचे मार्गदर्शन प्राध्यापक राठोड यांनी केले प्राचार्य अनिल ढांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावीनंतर आपण काय केलं पाहिजे कोणत्या क्षेत्राकडे जावे कोणते क्षेत्र निवडावे कोणत्या क्षेत्रात आपल्याला करिअरच्या अधिक संधी उपलब्ध आहे त्याकरिता योग्य मार्गदर्शन घेऊन त्या दिशा आपण निवडाव्या आणि त्या मार्गाने मार्गक्रम करावे असे आव्हान प्राचार्य अनिल ढांगे यांनी केले.कार्यशाळेचे आयोजक प्रा.राजेश जोगळे यांनी इयत्ता अकरावीचे ऑनलाईन बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ऑनलाईन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करावी अशा प्रकारचे मार्गदर्शन प्रा. जोगळे यांनी केले सर्व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले आणि उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानून कार्यशाळेचे समारोप करण्यात आले.