कर्ज परतफेडीच्या विवानचनेतून युवा शेतकरी याने विष प्राशन केलें उपचारदरम्यान मुर्त्यू.

0

युवा शेतकरी मृतक स्वप्निल मोगरे

कापसाला भाव नाही, उत्पन्न कमी, जंगली स्वपदाचा हैदोस, बँक कर्ज यां गोष्टी ठरल्या मरणास कारणीभूत

आष्टी शहीद : तालुक्यातील जामगांव येथील अल्पभूधारक युवा शेतकरी स्वप्नील अरुणराव मोगरे वय २७राहणार जामगांव यांनी शेतात कापशी पीक पेरले असून सतत नापिकी, जंगली स्वापडाचा हैदोस, कापसाला भाव नाही, बँक कडून घेतलेले कर्ज परत फेड करायचे यां विवानचनेत दि.२७डिसेंबर रोजी त्याने राहत्या घरी कीटक नाशक हे फवारणी औषध प्राशन केलें. पांच दिवसाच्या उपचारानंतर दि.३१डिसेंबर रोजी दुपारी ११वाजता स्वप्नील नें जगाचा निरोप घेतला.करता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती.
सविस्तर असें कि,
अरुणराव मोगरे यांना दोन मुले असून दोघेही अविवाहित आहॆ. वडील अज्ञ्नानी असल्यामुळे शेत दोनी मुलाच्या नावे करून दिले. साडे तिनं एकर शेती असून त्यातून मिळणाऱ्या उत्पादनातून घर खर्च चालवायची जबाबदारी स्वप्नील वर होती. शेतीत परिवाराचा उदर निर्वाह होत नाही म्हणून त्याचा भाऊ हा पुणे शहरात काम करण्यासाठी गेला. शेतीची जबाबदारी स्वप्नील वर होती, सतत होणारी नापिकी, कापसाला भाव नाही, जंगली जनावरचा त्रास यातून बँक परत फेड, घर खर्च करायचा कसा अशा विवानचनेत तो नेहमी असायचा. यां सर्व त्रासाला क टाळून त्याने जामगांव येथील राहत्या घरी, दि.२७रोजी दुपारी १२वाजता विषारी औषध प्राशन केलें. ही बाब शेजारी असणाऱ्या नातेवाईक यांना लक्षात आली. त्यांनी स्वप्नील ला साहूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भरती केलें. तेथून पुढील उपचारासाठी वरुड, व नंतर अमरावती येथील इर्विन रुग्णालय यात भरती केलें. पांच दिवसाच्या अथक प्रयत्न केल्यावर त्याने दि.३१डिसेंबर रोजी दुपारी ११वाजता जगाचा निरोप घेतला. ही वारता गावात येताच संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करित होते. दि.१जानेवारी रोजी स्थानिक मोक्ष धामावर अंत संस्कार करण्यात आला.

 नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 आष्टी शहीद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!