कोटंबा येथे ग्राम पंचायत व जिल्हा परीषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

0

सेलू : तालुक्यातील कोटंबा गावातील जिल्हा परिषद शाळेत आणि ग्राम पंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.तसेच यादिवशी प्रथम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पदाधिकारी सोबत संपुर्ण गावातून घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक अरविंद वैद्य आणि ग्राम पंचायत कार्यालयातील ध्वजारोहण सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी तंबाखू मुक्तीची शपथ आणि बाल विवाह रोखण्याबाबत शपथ गावकर्यासोबत घेण्यात आली.त्यानंतर शाळेच्या आवारात सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील आणि अंगणवाडीतील सर्व विधर्थी यामध्ये सहभागी झाले होते.यामध्ये भाग घेणाऱ्या सर्व विधार्थ्याना सरपंच रेणूका कोटंबकार यांच्या तर्फे भेटवस्तु देण्यात आल्या..मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले..यावेळी उपसरपंच अरविंद तुमडाम, ग्राम सेवक सुहास लंगडे,ग्राम पंचायत सदस्य रंजना राऊत, कुंदा फूंने, संगिता मसराम, करुणा सरोकार, सीमा कांबळे, नरेंद्र वांदिले,शिक्षक अनिल खंगार, राजेश मने, आबटकर,अंगणवाडी सेविका शोभा चिडाम, ज्योत्स्ना तुमडाम, मदतनीस वंदना मस्के, आशा वैशाली रघाटाटे,सौ. गाठे, आरोग्य सेविका सुनीता वाढवे , सुमित्रा नागोसे, ग्राम पंचायत कर्मचारी सूरज भोंगाडे, अशोक कांबळे, संगनक चालक सविता सरोकार, व गावातील नागरिक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

साहसिक न्यूज /24वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!