कोट्यवधींच्या क्रिकेट सट्टा अन् हवाला सिंडिकेटचा सूत्रधार ‘बंटी चोखाणी’ मोकाट;माजी मंत्र्याच्या आशीर्वादाने तपास यंत्रणा गप्प का?

0

🔥हाच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट व हवाला किंग बंटी उर्फ अमित चोखानी सटोडिया ला पोलिस केव्हा मुसक्या आवळणार

🔥कोट्यवधींच्या क्रिकेट सट्टा अन् हवाला सिंडिकेटचा सूत्रधार ‘बंटी चोखाणी’ मोकाट;माजी मंत्र्याच्या आशीर्वादाने तपास यंत्रणा गप्प का?

🔥क्रिकेट सटोडिया बंटी उर्फ अमित चोखाणीवर ईडी, आयकर विभागाची मेहेरबानी का? CBI ची धाड कुणी मॅनेज केली? यवतमाळात संतापाची लाट!

​यवतमाळ (प्रतिनिधी)-/ ​क्रिकेट सट्टा आणि कोट्यवधी रुपयांच्या बेकायदेशीर हवाला व्यवहारांचे आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवणारा कुख्यात सटोडिया बंटी उर्फ अमित चोखाणी याच्या काळ्या साम्राज्यावर अद्याप तपास यंत्रणांचे हात का पोहोचले नाहीत, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. यवतमाळ ते देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये हवालाच्या माध्यमातून कोट्यवधींची काळी कमाई फिरवणाऱ्या या सटोडियावर आयकर विभाग सक्तवसुली संचालनालय (ED), राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) यांसारख्या बलाढ्य यंत्रणांनी डोळेझाक का केली आहे? एका बड्या माजी मंत्र्याचा वरदहस्त लाभल्यामुळेच हे महाघोटाळ्याचे जाळे अद्याप सुरक्षित आहे का, अशी तीव्र चर्चा आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

बंटी उर्फ अमित चोखाणी याने नुकतेच एका नामांकित समाजमंदिराला कोट्यवधी रुपयांचे घसघशीत दान दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दान निनावी किंवा संशयास्पद पद्धतीने का दिले गेले? कोट्यवधी रुपयांची ही अफाट रक्कम नेमकी कोणत्या बँक खात्यांमधून, कोणाच्या आदेशाने ट्रान्सफर झाली? हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून हा काळा पैसा पांढरा (मनी लाँड्रिंग) करण्याचा हा पूर्वनियोजित कट होता का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत असतानाही आयकर विभाग आणि आर्थिक गुप्तचर यंत्रणांनी संबंधित बँक खाती, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि ऑडिटची साधी चौकशी करण्याचेही सौजन्य का दाखवले नाही, हे एक मोठे गूढ बनले आहे.मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी हवाला मार्गे कोट्यवधी रुपयांची रोकड यवतमाळात पोहोचल्याची ठोस माहिती थेट सीबीआयच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने बंटी चोखाणीच्या एका अत्यंत निकटवर्तीयाच्या घरावर छापाही टाकला होता. मात्र, हे प्रकरण बाहेर येण्यापूर्वीच एका वजनदार माजी मंत्र्याने थेट सूत्रे हलवून वरिष्ठ पातळीवर सेटिंग घडवून आणली आणि ही कारवाई जागीच थंड बस्त्यात गुंडाळली गेली. एका आंतरराष्ट्रीय सटोडियाला वाचवण्यासाठी माजी मंत्र्यांची ही अभद्र युती यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर काजळी फासणारी ठरली आहे. केंद्रीय यंत्रणांचे छापे राजकीय दबावात मॅनेज होत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल विचारला जात आहे.

शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या निमित्ताने गल्लोगल्ली ऑनलाइन सट्ट्याचा बाजार अक्षरशः उघड्या माथ्याने फोफावला आहे. तरुण पिढी या सट्ट्याच्या आहारी जाऊन बरबाद होत असताना, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र हात बांधून बसल्याचे चित्र आहे. शहरातील मुख्य बुकी थेट बंटी चोखाणीच्या संपर्कात असूनही पोलीस हप्तेखोरीच्या विळख्यात अडकून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा थेट आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

अवैध हवाला, मनी लाँड्रिंग आणि क्रिकेट बेटिंगचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे उघड असताना ईडी, सीआयडी आणि आयकर विभाग बंटी चोखाणीला नोटीस बजावण्याची हिंमत का दाखवत नाहीत? त्याच्या उत्पन्नाचे स्रोत, विदेशी संपर्कांचे तपशील आणि बेनामी संपत्तीची सखोल चौकशी का होत नाही? जर तात्काळ या क्रिकेट सटोडियाची आर्थिक कुंडली उघडून माजी मंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा गोरखधंदा उद्ध्वस्त केला नाही, तर यवतमाळकरांचा हा रोष थेट रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तपास यंत्रणांनी आपल्या निःपक्षपातीपणाचा पुरावा देत या रॅकेटच्या मुळावर घाव घालण्याची हीच खरी वेळ आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!