वर्धा -/येथील क्रांतिवीर महादेवराव सोशल असोसिएशन तर्फे येथील मुख्याधिकारी नगर परिषद मा. राजेश भगत यांना माजी आमदार स्व. महादेवराव ठाकरे यांच्या ठाकरे मार्केट वर्धा येथील पुतळ्याचे सोंदर्यकरण व रंगरंगोटी करणे बाबत रितसर निवेदन देण्यात आले.
क्रांतीवीर माजी आमदार स्व. महादेवराव ठाकरे, ठाकरे मार्केट येथील यांच्या पुतळ्याचे सौंदर्य करन व रंगरंगोटी करणे बाबत क्रांतीवीर स्व. महादेवराव ठाकरे सोशल असोसिएशन वर्धा संस्था सचिव श्रीमती शेलेजा मंगेश ठाकरे तर्फे निवेदन देण्यात आले.२६ आगस्ट लां स्व.महादेवराव ठाकरे यांची पुण्यतिथी असते परंतु बरेच वर्षापासून त्यांच्या पुतळ्या कडे दुर्लक्ष झाले म्हणून क्रांतिवीर माजी आमदार स्व. महादेवराव ठाकरे यांची नातसून श्रीमती शैलजा मंगेश ठाकरे यांच्या तर्फे तसेच सत्यजित मंगेश ठाकरे, रमेश मोहदूरे, रेश्मा बोभाते , शितल पुंड, सचिन हिवरे, निवेदन देताना उपस्थित होते व २६ आगस्त च्या आत काम पूर्ण करण्याचे आस्वासन सबंधित पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिले.