गरजू लोकांना ब्लॅंकेट वाटप…
देवळी : जानेवारी महिन्यामध्ये थंडीच्या लाटेमुळे थंडीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे त्यामध्ये फुटपाथ वर झोपणाऱ्या असंख्य गरजू लोक थंडीमुळे त्रस्त झालेले दिसत आहे. अशा गरजू लोकांकडे थंडीचा बचाव करण्याकरिता पर्याप्त प्रमाणात कपडे उपलब्ध नसल्यामुळे ते आपले जीवन हुडहुड त्या थंडीत जगत आहे.
त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते नरेश ढोकणे आणि मित्र परिवारातर्फे थंडीत झोपणाऱ्या असंख्य गरजू लोकांना ब्लॅंकेट चे वाटप करून त्यांना दिलासा दिला आहे. यापूर्वीही ढोकणे यांनी अशा अनेक सामाजिक कार्यामध्ये मदतीचा हात दिला आहे त्यांच्या या कार्याची आणि मानवीय दृष्टिकोनाची देवळी शहरांमध्ये भरभरून प्रशंसा होत आहे.
गरजूंना ब्लॅंकेट वाटप करताना नरेश ढोकणे यांच्यासोबत गणेश शेंडे, अजय रुद्रकार,मंगेश भगत आधी लोक उपस्थित होते.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी

