घोराड येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कायम स्वरुपी नियुक्ती करा.
🔥शिवसेना सेलू तालुक्याच्या वतीने दिला आंदोलनाचा इशारा
सिंदी (रेल्वे) : सेलू तालुक्यातील घोराड गावात जवळपास साठ टक्केच्या वर शेतकरी आहे आणि त्या पैकी अनेक शेतकऱ्यांकडे गाई, मशी, बकरी, आणि कुकुटपालन चा व्यवसाय आहे. परंतु, या ठिकाणी कायम स्वरुपी डॉक्टर नसल्यामुळे पशूपालक यांची वाताहात होत आहे. त्यामुळे येथील असलेल्या दवाखान्यात कायम स्वरुपी डॉक्टर देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रुख सुनील पारसे, तालुका प्रमुख अमर गूंधि, तालुका समन्वयक योगेश ईखार, सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे, तसेच पशू पालक यांच्या नेतृत्वात जिल्हा पशुवैद्यकीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सेलू तालुक्यातील घोराड या गावी पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत असून येथे मागील अनेक महिन्यापासून जनावरांचे उपचार करणारे डॉक्टर नसल्यामुळे येथील शेतकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. उपचाराकरिता आणलेल्या जनावरांना आल्यापावली जावे लागत आहे. सदर बाब पशू पालकांसाठी अत्यंत घातक ठरत आहे.
शेतीला जोड धंदा असावा म्हणून तालुक्यातील अनेक गावात पशू पालकांनी दुग्ध व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात पशू खरेदी केले. त्यामुळे तालुक्यातील दूध संकलन मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, जनावरांच्या उपचाराकरिता डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे संतप्त शेतकरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संबधित अधिकारी यांना निवेदन दिले. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी पशू पालक अतुल काकडे , महेंद्र ठाकरे, आशिष राऊत, शंकर गुजरकर, पांडुरंग तडस, सुनील राऊत, महादेव मुडे, वसंता झाडे, पंजाबराव पाटील , रवी धोंगडे, पंढरीनाथ वरटकर, राजेश महाकळकर, संजू सुरकार, सुनील गुळघाने, प्रदीप गोमासे, महेश सुरकार, वेदांशू पोहणे, विठ्ठल झाडे आदी उपस्थित होते.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज/24