आष्टी शहीद / तालुक्यातील थार ग्रामपंचायत च्या हद्दीत असणाऱ्या चामला गावात जसापूर तलावातून पाईप लाईन नें विहिरीत पाणी ओतले जाते येणारे पाणी दूषित असून पिण्या योग्य नाही.यां पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहॆ.
सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील माळरानावर वसलेल्या चामला गावात पिण्याच्या पाण्याची समस्या पाचवीला पूजली आहॆ.शेती शिवारात विहीर खोडल्यावर काळा गोटा लागतो पाण्याचा पत्ता लागत नाही. यां गावात गवळी समाज, आदिवासी, तेली, गवारी समाज मोठया संख्येने आहॆ. गेल्या ७५ वर्षा पासून पाण्याची समस्या कोणत्याही लोक प्रतिनिधी नें निकाली काढली नाही. वर्षा मागून वर्ष लोटली तरी प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. आता उन्हाळा तापत असताना पिणायच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करित उभी आहॆ.तात्पुरता उपाय म्हणून पाणी पुरवठा विभागाने कारंजा (घा) तालुक्यातील जसापूर तलावातून पाणी पाईप लाईन टाकून आणण्यात आले. ते पाणी टाकीत न नेता विहिरीत टाकले जाते. ते थून पुन्हा मोटारी नें टाकीत सोडले जाते.टाकीतून गावात सोडल्यावर अर्ध पाणी पाईप लाईन मध्ये राहते. महिला व पुरुष पाणी भरण्यासाठी शेजारी विहीरवर जातात तेव्हा ते गढूळ असल्याचे उघड्या डोळ्यातून पाहता येते.येणारे दूषित पाणी पिऊन तुष्णा भगवावी लागते. यां दूषित पाण्यामुळे आता चामला गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहॆ. आरोग्याची काळजी घ्यायला आता शुद्ध पाणी कोण उपलब्ध करून देणार हें मोठे कोडे आहॆ. शासकीय अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्यामुळे तक्रार देण्यासाठी व समस्या सांगायचं झाल्या तर ऐकायला कोणीच हजर नाही. दूषित पाणी पाईप द्वारे येत असल्याची माहिती दैनिक पुण्य नगरी च्या प्रतिनिधी कढे ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोक्काद्दम यांनी व्यथा मांडली. दूषित पाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. आता टँकर नें पाणी उपलब्ध करा अशी गावकरी यांची मागणी आहॆ.
अरुण घोडीले माजी ग्रामपंचायत सदस्य थार,जिला परिषद सदस्य छाया घोडीले यां असताना वेळोवेळी चामला गावाचा पाणी प्रश्न जिल्हा परिषद मध्ये उपस्थित,झाला. आष्टी येथील कापीलेश्वर तलावातून पाणी पुरवठा योजना मंजूर करून पाणी उपलब्ध करावा असा पाठ पुरावा सतत केला. निवेदन च्या प्रति देण्यात आल्या मात्र त्यावर प्रशासनाने कोणत्याही उपाय योजना केल्या नाही.
अश्विन वानखडे ग्रामसेवक थार ग्रामपंचायत,थार ग्रामपंचायत च्या अनंतर गत येणाऱ्या चामला गावाची पाणी समस्या दूर व्हावी म्हणून मी प्रशासनाला वेळोवेळी माहिती पूर्वीली. चामला गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे टँकर नें पाणी पुरवठा करणे गरजेचे आहॆ.चामला गावात माझे सतत येणे जाणे असते. टँकर सुरु करण्यासाठी हालचाली सुरु आहॆ.