चालबर्डी येथे भव्य सर्व रोग आरोग्य तपासणी शिबिर संपन्न..
वर्धा : महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय सालोड वर्धा व सेंटर फॉर एक्वाटीक लाईवलीहूड जलजीविका, इक्विटास डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि सीएमआरसी पांढरकवडा यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थानिक चालबर्डी केळापूर यवतमाळ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नंदा कोडापे (ग्रामपंचायत सरपंच चालबर्डी) व सावंगी मेघे येथील वैद्यकीय टीम यांच्या हस्ते रीतसररित्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराची दोन टप्प्यांमध्ये विभागणी करण्यात आली होती. शिबिरामध्ये कायचिकित्सा, पंचकर्म, शल्यतंत्र,बालरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, या विविध विषयावर घेण्यात आले. गावातील लोकांची आरोग्य तपासणी करून पुढील तपासणी करिता त्यांना सावंगी रुग्णालय येथे पाठविण्यात येईल, या शिबिरात गावातील स्त्री व पुरुष एकूण 148 लोकांनी सहभाग घेतला होता दुपारच्या सत्रात जलजीविका संस्थेने इ श्रम,आभा,आयुष्मान भारत, या योजनांचे लाभ कार्ड सुद्धा काढण्यात आले, गावातील लोकांना शासकीय योजना बद्दल माहिती देऊन त्यांना जागृत करून सदर योजनेच्या लाभासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच जलजीविका संस्थेच्या वतीने चक्रा स्कॉलरशिपच्या अंतर्गत मुलींसाठी करिअर गायडन्स बद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले.सदर शिबिरासाठी माननीय डॉ. अभ्यूदय मेघे विशेष कार्यकारी अधिकारी सावंगी मेघे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमाला डॉ. विनय नारा डॉ. ऋषिकेश देशमुख,डॉ.रिया राठोड,डॉ. कृतिका व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जलजीविकेचे गणेश तुळसकर व सुजाता बैस यांचे विशेष सहकार्य लाभले सुहेल रामटेके, दामिनी अखंड, रेमा तावडे,प्रियंका झोड, ,आरती पुसदकर, सी एम आर सी व्यवस्थापक पांढरकवडा गुना चापले, इक्विटासचे सीएसआर ऑफिसर गणेश बावणे, सोशल वर्कर नितेश बुरबुरे यांचे सहकार्य लाभले, जलजीविका सेंटर फॉर एक्वाटीक लाईवलीहूड संस्था पुणे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ मिश्रा तसेच प्रकल्प अधिकारी पद्माकर बोजा यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
सागर झोरे साहसिक न्यूज /24