जांब नदीवरील बांधाऱ्याचे काम पूर्ण,कामावर पाणी न टाकताच कंत्राटदार पसार.
आष्टी शहीद : आष्टी तालुक्यातील बांबरडा गावाजवळ असणाऱ्या जांब नदी वर सद्या बंधारा बांधकाम पूर्ण झाले आणि ताज्या बांधकामावर पाणी न टाकताच कंत्राटदार बेपत्ता झाले. हा प्रकार बोरखेडी येथील मारोती घटी यांनी कॅमेरात कैद केला आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविला.सविस्तर असें कि,आष्टी तालुक्यातील बांबरडा गावात दरवर्षी तीव्र पाणी टंचाई असते. यां गावाजवळून वाहणाऱ्या जांब नदीवर डिसेंबर महिन्यात बंधारा बांधला. बंधारा बांधकाम करताना कमी सिमेंट, लोखंड कमी, वापरून यां बांधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. बांधकामं होताच ओल्या बांधकामावर किमान १८ते २० वीस दिवस पाणी मारणे गरजेचे असते पण त्या बांधकामावर पाणी मारण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. कंत्राटदार आपला बिस्तरा घेऊन पसार झाला असें गावकरी यांचे म्हणणे आहॆ. पाणी न टाकल्यामुळे यां बंधाऱ्यला तडा जाऊन क्रॅक होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहॆ. बंधारा बांधकाम करतेवेळी ग्रामपंचायत ला विचारणा न करता बांधकाम कसे झाले हा आता संशोधनाचा विषय आहॆ. ग्रामपंचायत च्या हद्दीत कोणतेही बांधकाम करावयाचे झाल्यास ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच यांना विचारपूस करणे व त्याची परवानगी घेणे आवश्यक असते. हे बंधारा बांधकाम करण्यासाठी व बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी कोणताही अधिकारी यां ठिकाणी आला नाही. पावसाळ्यात जांब नदीला पूर येतो असतो आणि बंधारा वाहून गेला तर याला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होतो. शासनाच्या निधीचा अशा प्रकारे उपयोग केला जातो व विल्हेवाट कशी लावली जाते हे यातून पाहायला मिळते. हा सर्व प्रकार मारोती घटी यां शेतकऱ्याने कॅमेरायत कैद करून घेत अधिकाऱ्यांना दाखविला आहॆ. यां कंत्रादारावर चौकशी करून कार्यवाही करणे गरजेचे आहॆ.
लता कडताई सरपंच ग्रामपंचायत बांबरडा जांब नदीवर पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधला मात्र त्यावर पाणी टाकले नाही. बांधलेला बंधारा क्रॅक होण्याची भिती व्यक्त होत आहॆ. बांधकाम करताना ग्रामपंचायत ची परवानगी घेतली नाही. बंधारा फुटला तर जबाबदारी कोणाची हे कोडे आहॆ.
नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 शहीद आष्टी