जामणी येथील मानस अॅग्रो साखर कारखान्यांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची धडक…
शेतकऱ्यांच्या गोड उसाची कडू कहानी, मात्र शेतकरी संतप्त
वर्धा : उस गाळप हंगाम सुरू झालेला आहे. मात्र मागील महिनाभरापासून मानस अॅग्रो साखर कारखाना शेतकऱ्यांच्या उसाची तोड ठरलेल्या वेळेत करत नाही आहे. जामणी येथील कारखाना जाणीवपूर्वक बंद ठेवून इथला ऊस बाहेर जिल्हात गाळप केला जात आहे. ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचा ऊस रसवंतीगृहात व इतर गोपालकांना विकताना सरसकट आढळून आलेले आहे. यासंदर्भात कारखाना प्रशासनाला धारेवर धरले असता उडवा-उडवीची उत्तरे दिल्या जात आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासन ऊस तोड झालेल्या गाडीची वजन हे मानस अॅग्रो युनिट-3 येथेच वजन काटा करण्याची मागणी रेटून धरलेली आहे. प्रचंड तणावानंतर प्रशासनाकडून येत्या दोन दिवसांत वजन काटा सुरू करण्याची तोंडी हमी दिली. जर दोन दिवसांत केलेली मागणी पुर्ण न झाल्यास उभारी मोर्चा शेतकऱ्यांकडून काढण्यात येणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला. धडक मोर्चा देऊन कारखाना प्रशासनला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी परिसरातील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. गोड उसाचे कडू कहानी दिसून येत असून प्रशासन मात्र उदासीन असल्याचे बोलल्या जात आहे मात्र प्रशासनाकडून योग्य उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांकडून धडक उभारी मोर्चा निघणार असल्याचे संकेत आहेत.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24