🔥जिल्हा परिषद शाळा दहेगाव(गो) येथे संविधान दिन उत्साहात साजरा
सेलू -/ तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व भारताचे संविधान उद्येशिका च सामूहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी दहेगाव ग्रा चे विस्तार अधिकारी लिलाधर गुडवार, मुख्याध्यापक फटिंग,पराते, शिक्षिका सौ.पराते,तपासे, आसकर अंगणवाडी सेविका धोटे,कावळे,महाबुधे, राऊत,काकडे, कावळे, शंभरकर, विशेष कार्यकारी सदस्य संजय पिसुडडे व ग्रा.क.आंबाडोळे,पोहटे तिवाडे व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते, या प्रसंगी विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याचे ऐतिहासिक महत्त्व सविस्तर समजून सांगितले, संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्य समता स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्याचे जतन करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. व यावेळेस दहेगाव ग्रामपंचायत कडून भारताचे संविधान उद्देशिका चे प्रत्येक विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.