५० कोटींच्या रस्त्याच्या कामाची मलाई खाण्यासाठी आमदार राजु तोडसाम यांनी कंत्राटदाराची अडवणुक.

0

🔥हेच ते अर्नी विधानसभे चे भाजपा पक्षाचे आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी पाच कोटी ची खंडणी दिली नाही म्हणून आपले भावा चे जेसीपी ने खोदला रस्ता🔥आमदार राजु तोडसाम यांनी पाच कोटी रूपयासाठी टिप्पर अडविण्यासाठी खैरगावचा रस्ताच नालीत रूपातर केला हे बोलके चित्र

🔥५० कोटींच्या रस्त्याच्या कामाची मलाई खाण्यासाठी आमदार राजु तोडसाम यांनी कंत्राटदाराची अडवणुक.

🔥खंडणीखोर आमदार राजु तोडसाम मुळे विकास गेला रसातळाला 

​​यवतमाळ -/ जिल्ह्यातील आर्णी विधानसभा मतदारसंघात ५० कोटी रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी रस्ते विकासकामावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून ‘मॅक पॅरामाऊन्ट’ या कंपनीद्वारे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात स्थानिक आमदार राजू तोडसाम यांनी अडथळे निर्माण केल्याचा आणि कंत्राटदाराकडे पाच कोटी रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप तक्रारीद्वारे करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे मतदारसंघातील विकासकामे आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, संबंधित सर्व आरोपांबाबत प्रशासनाकडून अधिकृत चौकशीची मागणी होत आहे.

आर्णी विधानसभा मतदारसंघातील गावांना शहराशी जोडण्यासाठी केंद्र सरकारच्या निधीतून मंजूर झालेल्या ५० कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामात अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हे काम करणाऱ्या ‘मॅक पॅरामाऊन्ट’ या कंपनीकडे आमदार राजू तोडसाम यांनी पाच कोटी रुपयांची मागणी केली असून, रक्कम न दिल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिल्याची तक्रार कंत्राटदाराने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासोबतच खैरगाव येथील स्टोन क्रशरचा मार्ग अडवण्यासाठी नाले खोदल्याचा आणि परिसरात अवैध व्यवसायांना पाठबळ दिले जात असल्याचा दावा या तक्रारीतून व स्थानिक पातळीवरून करण्यात आला आहे. या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भाग मुख्य रस्त्यांशी जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आर्णी (क्रमांक ८०) विधानसभा मतदारसंघात ‘मॅक पॅरामाऊन्ट’ या कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत ५० कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम मिळाले आहे. मात्र, हे काम सुरू होताच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून त्यात अडथळे आणले जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

​तक्रारीतील नमूद माहितीनुसार, संबंधित कंपनीकडे पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, ही मागणी पूर्ण न झाल्यास काम होऊ दिले जाणार नाही, असा दबाव टाकला जात असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे कंत्राटदार कंपनीने थेट यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते विकासकामात कोणताही अडथळा न आणता काम नियमानुसार सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याचा दावा तक्रारदार आणि स्थानिक मजुरांकडून करण्यात आला आहे. खैरगाव येथील गट क्रमांक ११/१ मध्ये कार्यरत असलेल्या ‘श्रीराम स्टोन क्रशर’ आणि ‘आरीफ स्टोन क्रशर’ या प्रकल्पांतून रस्त्याच्या कामासाठी खडी व साहित्याची वाहतूक करणाऱ्या टिप्परना रोखण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाहनांची वाहतूक थांबवण्यासाठी मार्गावर मोठ्या प्रमाणात नाले खोदण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ​वाहतूक ठप्प झाल्यामुळे क्रशर प्रकल्पांचे कामकाज प्रभावित झाले असून, तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या रोजगारावर गदा आली आहे. आमची मजुरी बुडत असल्याने खोदलेल्या नाल्यांमध्ये तातडीने माती टाकून रस्ता पूर्ववत खुला करावा, अशी मागणी संबंधित स्टोन क्रशरवरील मजुरांनी प्रशासनाकडे केली आहे.

रस्ते कामाच्या वादासोबतच पांढरकवडा आणि आर्णी परिसरात अवैध धंद्यांना अभय दिले जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. परिसरात अवैध दारू विक्री, मटका, जुगार आणि क्लब खुलेआम सुरू असून, आमदारांचे स्वीय सहायक (पीए) अक्षय वातीले हे या अवैध व्यवसायांकडून वसुली करत असल्याचा गंभीर दावा या निवेदनातून करण्यात आला आहे.

​दुसरीकडे, या सर्व आरोपांवर संबंधित लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप केले जात आहेत की यामागे काही तथ्य आहे, याबाबत आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासनाचा निधी योग्य प्रकारे खर्च होऊन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण व्हावे, तसेच करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!