डॉ. स्वामी परमार्थदेवजी महाराज यांचे भव्य स्वागत,.. (आजहिंगणघाट येथे मोफत एकात्मिक योग शिबिर.
हिंगणघाट : रा.सु. बिडकर महाविद्यालय, हिंगणघाटचे भव्य प्रारंगणात स्थानिक पतांजलि योग समितीचे वतीने आज(२५) ला एक दिवसीय निशुल्क एकात्मिक योग शिबिर डॉ स्वामी परमार्थदेव जी महाराज यांचे उपस्थित पार पडणार आहे.योग ऋषी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांचे प्रिय शिष्य डॉ स्वामी परमार्थदेव जी महाराज मा. मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली योगपीठ हरिद्वार यांचे शहरात आगमनानिमित्य भव्य स्वागत करण्यात आले रथावर त्यांची पतांजलि आरोग्य केंद्र, बसस्थानक,नंदोरीचौक बिडकर महाविद्याल पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.योग शिबिरात सकाळी सहा ते आठ या वेळात मार्गदर्शन करतील.त्यानंतर कार्यकत्यांची सभेचे आयोजन असून.डॉ स्वामी परमार्थदेव जी महाराज यांचे आगमनानिमित्य स्वागत समारंभ व दिंड्या पालखीत मिरवणुक काढण्यात आली आहे.या शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन पतांजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी अध्यक्ष वसंतराव पाल गुरुजी यांनी केले आहे.स्वामी परमार्थदेवजी महराज यांचे स्वागत भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती,महिला पतंजली योग समिती, युवा भारत, पतंजली किसान सेवा समितीचे कार्यकर्ते तसेच वर्धा जिल्हा प्रभारी वसंतराव पाल गुरुजी, योगशिक्षक योगेश सुकंटवार,अनिल राजपांडे विजय धात्रक, प्रा.अजय मोहोड,मुंडेसर,प्रा.ज्ञानेश्वर खडसे,डॉ. गंगाधर नाखले,सुरेश दविले,पोर्णिमा धात्रक, पाचखेडे मॅडम,छायाताई दविले, प्रा.अनिल तरोडकर,वैभव निनावे,आयुष हावगे,पुरणलाल जैस्वाल,गोपाळ मांडवकर, रवि भालेराव,प्रमोदभाईमारे,परमेश्वर खडसे,प्रविण वरवटकर,सुभाष ठाकरे,कलूरकर,संजुअवचट,लक्षण तेजने ,रामानंद चौधरी,विद्या पेंटके,प्रसाद पाचखेडे,सिमा गलांडे,प्रिया बाभुलकर,ईटनकर ताई,सुरेखा तिजारे,संजिवनी ताई माने,मायाताई चव्हाण,प्रभाकर कोळसे, राजूरकर,सह शेकडै साधकांनी स्वागत केले.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज/24 हिंगणघाट