तहसील कार्यालय परिसरात आता मिळणार साऊथ इंडियन नाश्त्याची मेजवानी.!

0

🔥तहसील कार्यालय परिसरात आता मिळणार साऊथ इंडियन नाश्त्याची मेजवानी.!🔥‘श्री साई अमृततुल्य अँड साऊथ इंडियन तडका फॅमिली रेस्टॉरंट’चा थाटात शुभारंभ; रविंद्र कोटंबकार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन

सेलू : – तहसील कार्यालय परिसरात येणारे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना चहा-नाश्त्यासह जेवणाची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केळझर येथील युवा उद्योजक शुभम सोनटक्के यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री साई अमृततुल्य अँड साऊथ इंडियन तडका फॅमिली रेस्टॉरंट’चा उद्घाटन सोहळा गुरुवारी (ता. १९) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. रविंद्र कोटंबकार यांच्या हस्ते फीत कापून या प्रतिष्ठानाचे उद्घाटन करण्यात आले.

सेलू तहसील कार्यालय परिसरात आतापर्यंत चहाच्या टपरीव्यतिरिक्त नाश्ता किंवा जेवणासाठी विशेष सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना नाश्ता अथवा जेवणासाठी परिसरापासून दूर जावे लागत होते. ही गैरसोय लक्षात घेऊन शुभम सोनटक्के यांनी या परिसरात साऊथ इंडियन रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या व्यावसायिक पुढाकारामुळे आता परिसरातील नागरिकांना चहा, नाश्ता आणि खाद्यपदार्थांसाठी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे.

नव्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून ग्राहकांना चविष्ट साऊथ इंडियन खाद्यपदार्थांसह कुटुंबासोबत भोजनाचा आनंद घेता येणार आहे. तहसील कार्यालय परिसरातील खाद्यसेवेची उणीव भरून काढण्यासोबतच स्थानिक स्तरावर नव्या व्यवसायाची सुरुवात करण्याचा शुभम सोनटक्के यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरत आहे.

उद्घाटनप्रसंगी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र कोटंबकार, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशिनाथ लोणकर, व्यावसायिक साबीर शेख, देशोन्नतीचे पत्रकार भारत घवघवे, यशवंत वांदिले, संजय धोंगडे, गणेश धर्मूळ यांच्यासह शुभमचे आई-वडील, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी शुभम सोनटक्के यांना नव्या व्यवसायाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 सेलू, वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!