तीन अस्वलाच्या हल्यात वनमजुर गंभीर जखमी; सेवाग्राम रूग्णालयात उपचार सुरू
Byसाहसिक न्यूज24
गजेंद्र डोंगरे / आमगाव (मदनी):
माळेगाव ठेका येथील तामसवाडा बीटामध्ये जंगलकामा करिता वन मजूर म्हणून काम करीत असणारा युवक विवेक अरुण ठाकरे व 23 वर्ष हा दुपारी दोन वाजताच्या सुमारास तामसवाडी बीट मध्ये कामावर असताना तीन अस्वलांनी या युवकावर प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना घडली असून माळेगाव ठेका तामसवाडा या जंगलात सुदैवाने आजूबाजूला असलेल्या गुराखी व वन वजुरांच्या मदतीने युवकाचे प्राण वाचले असून मांडीला जबर चावा घेतला आहे तसेच पाठीला नखांनी वार केले असून जखमाजबर असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती वनाधिकारी तसेच गावातील नागरिकांना प्राप्त होताच ग्रामस्थांनी तसेच वन कर्मचाऱ्यांनी जखमी युवकाला सेवाग्राम येथील दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता तीन वाजता पासून उपचाराविना जखमी युवकाला ताटकळत राहावे लागले असल्याचे सोबत असणाऱ्या नागरिकांनी सांगितले. मात्र, रात्री उशिरा जखमी तरुणावर उपचार करण्यात आला असल्याने सध्या उपचार सुरू आहे.