दहा वर्षापासून स्मशानभूमी व कब्रस्तान मध्ये चिता न जळल्याने सावंगा पुनर्वसन गाव आले चर्चेत रस्त्या अभावी लाखो रुपयांच्या खर्चाला लागला चुना

0

🔥हेच ते दहा वर्षापासून स्मशानभूमी व कब्रस्तान मध्ये चिता न जळल्याने सावंगा पुनर्वसन गाव आले चर्चेत🔥हाच तो रस्त्या अभावी लाखो रुपयांच्या खर्चाला लागला चुना

साहूर,शरद वरकड -/ आष्टी तालुक्यातील साहूर जवळील सावंगा पुनर्वसन ही एक स्वतंत्र ग्रामपंचायत असून गेल्या दहा वर्षापासून येथील स्मशानभूमी व कब्रस्तान चे बांधकाम करण्यात आलेले आहेत परंतु आज पर्यंत या ठिकाणी कुणाचीही चिता जडली नाही आणि कुणालाही दफन करण्यात आले नाही कारण या ठिकाणी जाण्याकरिता जो रस्ता पाहिजे त्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले असून त्यामध्ये पाणी साचतो व चिखल होतो याच कारणामुळे सावंगा पुनर्वसन येथील नागरिक दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या साहूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतात परंतु सावंगा पुनर्वसन जवळ असलेल्या व स्वतःच्या ग्रामपंचायत मार्फत बांधकाम करण्यात आलेल्या स्मशानभूमीत कोणीही प्रेत नेत नसून त्या ठिकाणी मुस्लिम बांधव सुद्धा दफनविधी करत नाही त्यामुळे शासनाच्या वतीने वतीने करण्यात आलेला हा अवाढव्य खर्च पाण्यात बुडालेला आहे शासनाच्या वतीने बांधकामावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याची मात्र सुविधा केली नसल्याने या खर्चाला चुना लागलेला आहे त्यामुळे सावंगा पुनर्वसन येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत जर शासन प्रशासनाच्या वतीने लवकरात लवकर रस्त्याचे बांधकाम केले नाही तर साहूर येथील बस स्थानकावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले जर रस्त्याची सुविधा करणार नव्हते तर स्मशानभूमी व कब्रस्तान यांची निर्मिती का केली? असा प्रश्न येथील नागरिक करीत आहे गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी बांधकामात मोठी वाढ होत आहे स्मशानभूमीच्या बाजूने सर्व जाळीचे कंपाऊंड करण्यात आले कब्रस्तानसाठी शेड बांधण्यात आले मशानभूमी भोवती झाडे लावण्यात आली या ठिकाणी पाण्याच्या टाकी सह नळाची व्यवस्था करण्यात आली बाजूलाच सुका कचरा ओला कचरा याचे शेड करण्यात आले . पिण्याच्या पाण्याचे मोठे टाके बांधण्यात आले परंतु त्या ठिकाणी जाण्याकरता रस्ताच खराब असल्याने या स्मशानभूमीचा व कब्रस्तानचा उपयोग काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनुत्तरीत आहे जर लवकरात लवकर रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नाही तर सावंगा पुनर्वसन येथील नागरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा येथील नागरिकांनी दिलेला आहे सावंगा पुनर्वसन येथील सरपंच विनोद सोनोने यांनी ग्रामपंचायत च्या वतीने कागदोपत्री पाठपुरावा केला मात्र निधी मिळत नसल्याने त्यांनी असे सांगितले की जर आता लवकरात लवकर निधी मिळाला नाही तर साहूर येथील बस स्थानकावर अंत्यसंस्कार केल्या जाईल त्यामुळे गावातील वातावरण हे अतिशय पेटले असून शासन प्रशासनाच्या वतीने ताबडतोब याचे निराकरण करण्याचे मत येथील सरपंचासह नागरिकांनी व्यक्त केलेले आहेत हे विशेष(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!