🔥देवळी तालुक्यातील काजळसरा प्रकरण तापले – भीम जयंतीच्या पर्वावर झालेला गोंधळ अजूनही पोलिसांची कार्यवाही नाही.🔥काजळसारा येथील नागरिक संतप्त…..दादागिरी करणाऱ्या पोलिसांवर लवकरात लवकर कार्यवाई करण्याची मागणी.🔥भीम आर्मीचे पोलिस अधीक्षकांना निवेदन, ३ दिवसांत कारवाईचा इशारा.
देवळी -/ वर्धा,आज भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेच्या वतीने पोलिस अधीक्षक, वर्धा यांना निवेदन देण्यात आले. देवळी तालुक्यातील काजळसरा गावात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान रवींद्र दुधे नामक व्यक्तीने ग्रामस्थांशी वादविवाद केल्याची घटना घडली.या प्रकरणात संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, तसेच कोणतेही ठोस कारण नसताना गावकऱ्यांवर व बौद्ध अनुयायांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली. यासोबतच, निष्कारण लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.यावेळी पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणाचा अहवाल येत्या ३ दिवसांत सादर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे भीम आर्मी भारत एकता मिशन व काजळसरा येथील ग्रामस्थांनी पुढील आंदोलनाचा इशारा दिला आहे.या निवेदनावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे (रावण), महिला जिल्हाध्यक्ष शीतल पवार, प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा संघटक आशिष सालोडकर, सामाजिक कार्यकर्ते अनुराग डोंगरे यांच्यासह काजळसरा गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.(क्रमशः)