भिडी / देवळी तालुक्यातील नजीकच्या हिरापूर तळणी या गावात रहिवासी असलेल्या कृष्णराव गणपतराव कुंभारे वय ४५ वर्ष या शेतकऱ्यांनी आज रोजी दुपारी १२ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांच्याकडे वडिलोपार्जित ४ एकर शेती होती तसेच कुटुंबातील उदरनिर्वाह कृष्णराव गणपतराव कुंभारे ते स्वतःच कुटुंबातील उदरनिर्वाह चालवित होते परंतु सततची नापिकी शेतमालाला मिळत नसलेला हमीभावामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच गेला ते नेहमी चिंतेत असायचे त्यांच्यावर राष्ट्रीयकृत बँक उसनवारी व कृषी केंद्राचे असे एकूण अंदाजे पाच लक्ष रुपयांचे कर्ज असल्याचे बोलले जात आहे त्यांच्यावर अंतिम संस्कार राहत्या गावात हिरापूर येथे सायंकाळी होणार आहे त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.