देवळी येथील अथर्व भोजनालयात दारु साठा जप्त,
हेच ते अथर्व भोजनालय दारू साठा जप्त करण्यात आले असून भोजनालय मालकावर देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
🔥मुलगा न्यूज संपादक आणि गृहरक्षक,असल्याचा केला गैरफायदा..
देवळी : शहरातील पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार २७ जानेवारी ला शनिवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वर्धा यवतमाळ रोडवरील अथर्व भोजनालय देवळी येथे धाड टाकून दारुचा माल जप्त करण्यात आला. नेहमी सायंकाळच्या वेळेला या हॉटेलमध्ये सारखी गर्दी पहावयास मिळत होती . संशयाच्या आधारावर आणि सभोवतालच्या नागरिकांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी धाड टाकली असता काही इसम तिथे टेबलवर काही शिषा ठेवून बिनधास्तपणे दारू पीत असल्याचे आढळून आले . सदर भोजनालय चालक तिथे त्यांना सेवा पूर्वीत असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनात आले यावरून आरोपी अथर्व भोजनालय चालक जगन रामकृष्ण वैद्य वय (45)रा.अन्य तीन मद्यपी यांच्या विरोधात देवळी पोलीस स्टेशन येथे विविध कलम अंतर्गत नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर हॉटेल चालकाचा मुलगा कोणत्यातरी डिजिटल मीडियाचा संपादक म्हणून काम करतो , आणि वर्धा पोलीस दलात गृह रक्षक म्हणून सुद्धा काम करतो. कायद्याचे रक्षक असलेल्या गृह रक्षकाच्या घरीच अवैध धंदा चालू असल्याने चर्चेस उधान आले आहे. बरेच दिवसापासून येथे सायंकाळी गर्दी पहावयास मिळत आहे अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे . पुढील तपास देवळी पोलीस करीत आहे.
सुमित ग.झोरे साहसिक न्यूज/24 देवळी