साहुर,आष्टी-/ तालुक्यातील साहुर येथे जाम नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम सुरू होते ते निकृष्ट होत असल्याचे निवेदन शिवसेना शाखा साहुर च्या वतीने शिवसेना पदाधिकारी नानकसिंग बावरी,अशोक ढबाले,सुरेश ढबाले,सुरेश टरके,विजय गावंडे,विनायक हेडाऊ,अनिल धुर्वे, प्रफुल मुंदाने,श्याम शिर्के,छगन ढोरे, शरद वरकड,यांच्या मार्फत आष्टी येथील तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.याची लगेच दखल घेत बांधकाम करण्यासाठी अनेक मजुरांचा ताफा कोल्हापुरी बंधाऱ्यावर काम करण्यासाठी धडकला व चांगल्या दर्जाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामावर आता शिवसेनेच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे हे विशेष.
साहुर येथील जाम नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम सुरू असून त्या पुलावरून मुरूमाचे मोठे ट्रक नेण्यात आले याची तक्रार सुध्दा केली आहे त्यामुळे ओव्हरलोड वजन झाल्याने काही भाग डॅमेज झाला होता आता सर्व दुरूस्ती करून कामाला गती देण्यात आली आहे.ससाने,मुद्र जलसंधारण विभाग आर्वी