🔥उद्याला नागपुर येथे खैरे कुणबी समाज संघटनेचे पहिले राज्यस्तरीय महाधिवेशन.
वर्धा -/राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त रविवारी ११ मे रोजी, स्व. विमलाताई देशमुख सभागृह धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर येथे सकाळी ११ ते ३ या दरम्यान, राज्यस्तरीय दहावी ते पदव्युत्तर (आर्ट, कॉमर्स, सायन्स, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन शिबिर, तथा १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा महाराष्ट्र व इतर राज्यातील खैरे कुणबी समाज बांधवांनी व विद्यार्थ्यांनी, व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अश्या सूचना गुणेश्वर आरीकर यांनी केले.
विदर्भामध्ये पहिल्यांदा खैरे कुणबी समाजाचे महाअधिवेशन होणे म्हणजेच एक समाजामध्ये गौरवाची बाब आहे. या संघटनेने महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यांमध्ये जाऊन समाज एकत्र करण्याचे कार्य केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. अनेक महापुरुष इथे घडलेले आहेत. संत शिरोमणी तुकाराम महाराज, शिवछत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, शाहू महाराज, अनेक संतांनी व महापुरुषांनी देशामध्ये क्रांती घडवून आणली. यांचे विचार समाजामध्ये पेरण्याचे काम या संघटनेने केले आहे खैरे कुणबी समाज हा आर्थिक, सामाजिक, व राजकीय दृष्ट्या दुर्बल आहे. हा खैरे कुणबी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. पण विखुरला आहे. समाजाला मुख्याधारेमध्ये आणण्याकरिता मोठ्या प्रमाणात समाजाची बांधणी चालू आहे. राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये समाज उपयोगी सामाजिक अनेक मुद्द्यावर चर्चा होणार आहे व वक्त्यांकडून मार्गदर्शन होणार आहे या अधिवेशनाला युवा वक्त्यांना बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक व त्याला वेग वेगळे विषयी दिलेले आहेत. आजची भरकटलेली युवा पिढी, आजच्या युवकांची दशा आणि दिशा, नशा मुक्ती आणि सामाजिक जागरूकता, व्यक्तिमत्व विकास, संविधान जागृती, महिला सक्षमीकरण व सबलीकरण, नॉन क्रिमिलियर व फ्रीसिप योजना, व्यावसायिक मार्गदर्शन, कुणबी समाज संघटना व कार्य, महा ज्योती व समाज कल्याण, शासनाच्या मोफत योजना इतर विषयावर वक्त व्याख्यान करणार आहेत. या महा अधिवेशनाला महाराष्ट्र मधून व इतर राज्यांमधून खैरे कुणबी समाजाचे नेते, समाजाचे अध्यक्ष सचिव, संघटक, महिला भगिनी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उद्घाटक. इंजि. भाऊसाहेब थुटे राष्ट्रीय प्रबोधनकार व सप्तखंजिरी वादक वर्धा, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर, सुप्रसिद्ध कवी संपादक लोकजागर इंडिया, विशेष अतिथी, डॉ.विजय देवतळे अध्यक्ष खैरे कुणबी समाज चंद्रपूर, सत्कारमूर्ती एड. भैय्याजी पोंगळे संस्थापक अध्यक्ष उमरेड, विजय वाकुलकर प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर, प्रा. अनिल चिताळे डीन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली. डॉ राजेश ठाकरे रामटेक, बाबाराव उंबरकर ज्येष्ठ समाजसेवक, सौ.वृंदाताई विकास ठाकरे नागपूर शहर अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ, देवाजी भुजाडे ज्येष्ठ समाजसेवक, हिना पांडुरंग देशमुख पीएसआय नागपूर, प्रमुख उपस्थितीमध्ये दिगंबर पाटील गुरपुडे, मोहन डंबारे, ॲड.स्वप्निल मोढे, एड. गिरीश बोभाटे, प्रमुख वक्ते वृषभ राऊत, प्रा. शेषराव येलेकर, श्याम लेडे, शिवशंकर मुंगाटे, शांतनु धोटे, सौ. रत्नमालाताई भोयर, एड. अमित झोटिंग, स्वप्निल भुसे, आकाश टाले, सुरेखा रडके,संगीता बडे, भैय्याजी रडके, विदर्भ अध्यक्ष गुणेश्वर आरीकर, विनोद सातपुते,संध्या भास्कर थुटे, विनोद दोंदल आयोजक: विदर्भ खैरे कुणबी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य) पदाधिकारी व महिला मंडळ सहभागी होणार असल्याचे विदर्भ अध्यक्ष गुणेश्वर आरिकर यांनी सांगितले.
तेव्हा या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातुन समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन समाज बांधव विनोद सातपुते यांनी केले आहे.