पाचशे रुपयांची नोट…मागितले दहा रुपयांचे तिकीट…!महिला कंडक्टरचा विनयभंग आणि केली किटकिट
Byसाहसिक न्यूज24
मुक्ताईनगर / पंकज तायडे :
दहा रुपयांच्या तिकीटासाठी पाचशे रुपयांची नोट देत वाद घालून महिला कंडक्टरचा भर प्रवाशांसमोर विनयभंग करणा-या प्रवाशाविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला विनयभंगासह शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव सुनिल जाधव रा. अंबिलहोळ ता. जामनेर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीत प्रवाशाचे नाव आहे.
सुटे पैसे ठेवायचे तुमचे काम आहे असे म्हणत शिवीगाळ करत महिला कंडक्टरच्या कानशिलात लगावल्याचा गौरव जाधव या प्रवाशाविरुद्ध आरोप करण्यात आला आहे. कानशिलात लगावल्यानंतर महिला कंडक्टरच्या शर्टाचे उजवे बाजुचा खिसा फाडून नुकसान करत खालच्या स्तरावरील शिवीगाळ केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला कलम 353, 294, 323, 504, 506, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार साहिल तडवी करत आहेत.