पोलीस जमादाराची युवकास मारहाण..

0

युवकाने केली पोलीस जमादार विरुद्ध पुलगाव पोलीस स्टेशनला तक्रार.

देवळी : तालुक्यातील दुर्गुडा येथे शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस जमादार शेखर नेहारे यांनी दुर्गुडा येथील अनिकेत प्रफुल मून वय १९ वर्ष याला कोणतेही कारण नसताना दुर्गुडा या गावांमध्ये मारहाण केल्याची घटना घडली आहे.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता गावातील प्राथमिक शाळेजवळ तक्रारदार अनिकेत मून हा उभा असतांना जमादार शेखर नेहारे येथे आले व तु गळ्यात चैन व हातात कडा घालून तू का इथे उभा आहे तू काय करत आहे असे म्हणून युवकास मारहाण केली त्या मारहाणीमुळे गावातील नागरिक तथा शाळेतील कर्मचारी वर्ग येथे जमा झाला व मारहाण केलेल्या युवकाची आई तिथे येऊन माझ्या मुलास का मारहाण केली असे विचारले असता पोलीस जमादार शेखर नेहारे त्याच्या चार चाकी वाहनाने त्याने तिथून पळ काढला पोलीस जमादार शेखर नेहारे हा मध्यधुंद अवस्थेत होता अशे आपल्या तक्रारीत सांगितले आहे.युवकाच्या तोंडी तक्रारीवरून पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार युवकाची तोंडी तक्रार घेण्यात आली आहे.कोणती कारवाई या पोलीस जमादारावर होणार याकडे दुर्गुडा येथील रहिवाशांचे लक्ष लागलेले आहे.
                                          क्रमश

सागर झोरे साहसिक न्यूज/24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!