प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचा लाभ मिळाला अपघात ग्रस्त कुटुंबाला…
शाखा बँक ऑफ इंडिया आष्टी अंतर्गत देण्यात आला दोन लाख रुपयाचा धनादेश.
आष्टी शहीद : तालुक्यातील पांढुर्णा येथील रहिवासी दिलीप दत्तूजी नेहारे या मजूर शेतकऱ्याचा काही महिन्या आधी दुचाकी गाडीने अपघात झाला होता या अपघातात तो मरण पावल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते मात्र प्रधानमंत्री सुरक्षा विम्याच्या माध्यमातून मदत मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांना आधार मिळाला.
सविस्तर वृत्त असे की मृतक दिलीप नेहारे याने बँक ऑफ इंडिया आष्टी येथे खाते काढतेवेळी प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला होता. दिलीप कुमार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने ही बाब आष्टी शाखेचे बी.सी. मनोज बंदरकर यांच्या लक्षात आली की मृतक व्यक्तीने आपल्या बँक शाखेमध्ये विमा काढला आहे या विम्याचा लाभ त्यांच्या कुटुंबांना मिळावा याकरिता सर्व कागदपत्रे जमा करून बँक ऑफ इंडियाची व्यवस्थापक यांच्याकडे देण्यात आली त्यानंतर मृतक दिलीप नेहारे यांचे वारस आई कांता व वडील दत्तूजी नेहारे यांना बँक ऑफ इंडिया शाखा आष्टी येथे बोलावून बँक व्यवस्थापक सचिन आवारी यांच्या हस्ते दोन लाखाचा धनादेश पीडित कुटुंबाला देण्यात आला., यावेळी बी.सी मनोज बोंदरकर दप्तरी मंगेश चेन्नई, रीना नंदनवार, खुशाल मेहता व इतर कर्मचारी उपस्थित होते.
नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 आष्टी शहीद