बँक व्यवस्थापकाने सांगितला शेतकऱ्याला जीआर.
पिक विम्याचे बचत खात्यात पैसे जमा करण्यास नकार
देवळी : तालुक्यातील अंदोरी येथील पंजाब नॅशनल बँकेचे व्यवस्थापकानी प्रधानमंत्री किसान सन्मान व प्रधानमंत्री फसल विम्याची रक्कम बचत खात्यात न जमा करता सरळ सरळ कर्ज खात्यामध्ये जमा केली वाटखेडा येथील शेतकरी दिलीप आनंदराव भोयर यांना प्रधानमंत्री किसान सन्मान व प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ सदर शेतकऱ्याला शासनाच्या वतीने देण्यात आला. सदर शेतकरी अंदोरी येथील पंजाब नॅशनल बँकेचा खातेदार आहे. शासनामार्फत मिळालेल्या पीक विम्याचे पैसे आपल्या बचत खात्यामध्ये जमा करावे असा अर्ज बँक व्यवस्थापकाला दिला असता बँक व्यवस्थापकानी शेतकऱ्याला बचत खाते खात्यात पैसे जमा करण्याचा शासनाचा जीआर जोडण्यास सांगून त्याच्या अर्जावर लेखी स्वरूपात टिपणी करून त्याला परत पाठविले. शासकीय योजनेचा लाभ खातेदाराच्या परवानगीशिवाय बँक व्यवस्थापकाला आपल्या मनमर्जीप्रमाणे कर्ज खात्यात जमा करण्याचा अधिकार नसताना पदाचा दुरुपयोग करून जबरदस्तीने शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये जमा केले आहे. बँक व्यवस्थापकाच्या मनमर्जी कारभारावर वरिष्ठ अधिकाऱ्याने त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
—————————————-
भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश सचिव राजेश बकाने यांना सदर शेतकऱ्याने आपबिती सांगितली असता बँक व्यवस्थापकाचे व्यवहार नियमाला धरून नसून शेतकऱ्याला अडचणीमध्ये टाकने बेजबाबदारपणे काम करण्याचे असून शेतकऱ्याला आर्थिक अडचणी मध्ये टाकण्याचा हा प्रकार आहे याप्रती व्यवहारामध्ये सुधारणा होत नसेल तर मगरुड पणे वागणाऱ्या व्यवस्थापकासोबत जसास तसे उत्तर देण्यात येईल असे सांगितले.
सागर झोरे साहसिक न्यूज/24 देवळी