बिडकीन -/ पोलीस स्टेशन बिडकीन हद्दीतील सर्व सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती सर्व तंटामुक्ती अध्यक्ष सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाची स्थापना करणारे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्व पत्रकार बांधव यांना आगामी येणाऱ्या ईद-ए-मिलाद गणेशोत्सव सणांच्या अनुषंगाने मा उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभाग पैठण सिद्धेश्वर भोरे,बीड़कीन पोलिस निरीक्षक प्रमोद पाटिल यांच्या उपस्थितीत बीड़कीन येथे शांतता समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.बिडकीन पोलीस स्टेशन कडून पैठण रोड गौरी लॉन्स येथे गणेश उत्सव व ईद निमित्त उपविभाग पैठण सिद्धेश्वर भोरे, यांनी शांतता समन्वय बैठक घेतली बिड़किन पोलिस निरुक्षक पाटिल यांनी संगीतले दोन्ही समुदायाने आपले सण उत्साहाने व एकमेकांच्या सहकार्याने साजरे करा, व सर्वकृष्ट गणेश मंडळाला चर्चा करुण परितोषिक देण्यात येईल असे संगीतले. ईद निमित्त जुलुस मीरवनुकी साठी संगीतलेला मार्ग सूचवा आम्ही देवू,तसेच डीजे न लावता परंपारीक वाद्यांना प्रादान्य दया असे संगीतले. बिडकीन गावाचे प्रथम नागरिक सरपंच अशोक धर्मे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की उत्सव एकमेकांच्या सहकार्याने शांततेत व उत्साहात साजरे करा असे आव्हान केले.तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य असलम भैया यानी आगामी काळात येणारे उत्सव एकमेकांच्या सहकार्याने शांततेत पार पाडण्याचे आव्हान केले. सिद्धेश्वर भोरे, यानीं मार्गदर्शन करताना उत्सव सर्वानी एकमेकांना सहकार्य करून शांततेत पार पाडा असे सांगितले व आगामी काळात कोन्ही उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे संगीतले. यावेळी अशोक धर्मे, काकासाहेब पाटिल टेके, किरण गुजर माजी ग्रा,स, असलम भाई सय्यद,भाजपचे तमीजभाई इनामदार, ग्रामपंचायत सदस्य सागर फरताळे, जीजा, आर्या वंजारे, सुभाष जाधव,डीबीएसचे शिवानंद बनगे,बीडकीन बीटचे बल्लाड,धनेधर,शेखर,पत्रकार गणेश सोनावने,नवसूर्य संपादक इलियास शेख,पत्रकार फेरोज मर्ज़ा,बीड़कीन हद्दीतील सर्व सरपंच, प्रतिष्ठित व्यक्ती सर्व तंटामुक्ती अध्यक्ष सर्व पोलीस पाटील,ईद कमिटीचे अध्यक्ष ,सदस्य,गणेश मंडळाची स्थापना करणारे, मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामसथ उपस्थित होते.