ब्राह्मणे साहेब…! आमच्या मुलांना वाचवा हो..! पवनार वासियाची आर्त हाक
Byसाहसिक न्यूज24
सतीश अवचट/ पवनार :
पवनार हे विनोबा भावे व गांधीजी यांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेले गाव आहे. पण सद्या मात्र या गावात दारूची गंगा वाहत आहे.त्यातही मोठी भर म्हणजे की या दारू विक्रीच्या धंद्यात मोठ्या प्रमाणात १५ ते १६ वर्षाची लहान मुळे दारू विकत आहे. सद्द्याच्या पिढी कमी वेळात व कोणतीही मेहनत न करता काश्या प्रकारे जास्तीत जास्त पैसे कमवता येईल या कडे वळलेली आहे. त्यातूनच पवनार येथील लहान मुळे जास्तीत जास्त दारू विकणाच्या मार्गी लागले आहे. मोठ मोठे दारू विक्रेते याच संधीचा फायदा घेवून या लहान मुलांना धंद्यात ओढत आहे. एक दारूची डपकी भट्टी वरुन दारू विक्रेत्याच्या घरी पोहचून देण्यासाठी ५०० रुपये दिल्या जाते.त्यातही नवीन मले असल्याने ती कोणाच्याही नजरेत येत नाही . व पोलिस पकडण्याची भीती सुद्धा नाही. दारू विक्रीच्या पैशातून अनेक मुले वाईट मार्गाला लागत आहे. तर काही मुले दारू भट्टिवरून दारू विक्रेत्याच्या घरी दारू पोहचली की येथेच्छ दारू पिऊन घरी येतात व परिवारातील सदस्य यांना मारहाण सुद्धा करतात.
त्यातच सद्या कोणतेही काम धंदे नसल्याने जो तो दारू विक्री करीत आहे. यातूनच गावातील प्रत्येक चौकात भाजी बाजार सारखे दारूचे दुकाने लागली आहे. पोलिसांना सर्व माहित असताना सुद्धा कोणतीच कारवाई करीत नसल्याने दारू विक्रत्यांची हिम्मत वाढत चाललेली आहे. आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही च्या तोऱ्यात वावरून पुन्ह जोमाने दारू विकतात या मुळे आमच्या परिवारात रोज वाद होतात व आमच्या परिवाराची शांतता भंग होत आहे. तसेच रोजच्या शिव्या मुळे आजू बाजू लोकांना सुद्धा खूप मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.या मुळे आपण या दारू विक्रेत्या वर लवकरात लवकर कारवाई करावी व दारूच्या आहारी गेलेल्या आमच्या मुलांना सामान्य जीवन जगण्याचा अधिकार मिळवून द्यावा अशी मागणी पवनार येथील नागरिकांनी सेवाग्राम ठाणेदार यांना केली आहे.