मंदिर स्वच्छता अभियानाला आष्टी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद.
वर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील नवनिर्मित भव्य मंदिरात रामलला प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने संपूर्ण देशातील संपूर्ण गाव शहरातील मंदिर स्वच्छता अभियाना संदर्भात केलेल्या आवाहनाला आष्टी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आष्टी शहरातील विविध मंदिरात व मंदिर परिसरात साफसफाई व स्वच्छता अभियान 18 जानेवारीपासून राबविण्यात आले. आष्टी शहरातील पुरातन श्री राम मंदिर,खडकपुरा, मंगळवार पुरा येथील श्री हनुमान मंदिर, भवानी मंदिर, भूतेश्वर देवस्थान,कपिलेश्वर श्री गणेश मंदिर,गमामाय देवस्थान, गोरोबा मंदिर,दुर्गा मंदिर,विठ्ठल मंदिर येथे भाजप कार्यकर्त्यांनी मोहल्ला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले.या अभियानात भाजपचे जिल्हा महामंत्री अशोक विजयकर तालुका अध्यक्ष कमलाकर निंभोरकर शहर अध्यक्ष एडवोकेट मनीष ठोंबरे महामंत्री नरेंद्र भनेरकर युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध दंडाळे आवेज खान प्रज्वल चोहटकर उज्वल शिरभाते सुनील मांडवे गजानन होले सुधाकर नीचत भोलानाथ भोयर गौरव कोल्हे प्रसाद मोकदम ओम हिरुडकर सत्यनारायण शर्मा रोहन देशपांडे नीरज भार्गव रवी काळे शरद देशमुख निलेश डांगे प्रदीप चचाने संदीप डांगे अनिल गोबाडे रामदास खाजवणे सुजल बनाईत कार्तिक देशमुख देवांश बानाईत बाळू कनेर पुरुषोत्तम वासनकर प्रकाश पाचघरे राजे रामजी डहाके अरुण भोजने उषा सोनटक्के कलांता सोनटक्के प्रमिला शिनकर हरिहर केळोदे गिरीश आजणे प्रदीप गुप्ता दिलीप पाटील कृष्णा जामोदकर युवराज निशिदकर विजय खांडेकर रोहन डांगे आयुष पाचघरे आदींनी सहभाग घेतला होता
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 वर्धा