मदनी अमागाव येथे तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरी.
सेलू : तालुक्यातील मदनी आमगाव येथे १जानेवारी ते ३जानेवारी पर्यंत राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांची ५५ व्ही पुण्यतिथी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून परिसरात मंगलमय वातावरण दिसून येत आहे. यानिमित्ताने गावात साफसफाई ,सामुदायिक ध्यान, आरोग्य शिबिर, भजन, महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, सामुदायिक प्रार्थना, गोसेवा बद्दल माहिती, पशु शिबीर, बाल आरोग्य शिबिर ,तसेच रात्री ह. भ. प. मयूर महाराज दरणे पंचमुखी देवस्थान केळाकेळी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तुकडोजी महाराज यांची ५५ पुण्यतिथी महोत्सव निमित्त परिसरातील उपस्थित भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या मदनी, कासारखेडा, मजरा, सावध, अकोली , सालई, बोरगाव गोंडी, माळेगाव, साखर कारखाना, अकोली हेटी, तामसवाडा, आमगाव, बोरखेडी, खैरी, श्रीकृष्ण हायस्कूल मसाला, प्राथमिक शाळा मदनी, दिनकर नगर हायस्कूल जामणी सागर कारखाना इत्यादींची प्रमुख उपस्थिती दिसून आली होती.आरोग्य शिबिर श्री सत्य साई मोबाईल मेडिकेअर प्रोजेक्ट टीम वर्धा आरोग्य संकल्पच्या अंतर्गत कौटुंबिक आरोग्य कार्ड आयुष्यमान भारत कार्ड आपुलकी आरोग्य कार्ड तीन सावंगी मेघे तर्फे पशु शिबिर डॉक्टर प्रणिता पाणतावणे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती सेलु तसेच डॉक्टर वीरेंद्र सोनकुरे पशुधन विकासाधिकारी पंचायत समिती सेलू डॉक्टर गजानन चारभे पशुधन पर्यवेक्षक झेडसी यांचे मार्फत बाल आरोग्य शिबिर डॉक्टर सचिन पावडे बालरोगतज्ञ वैद्यकीय जनजागृती मंच वर्धा यांचे तर्फे महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयात ३ जानेवारी ला भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष ह भ प श्री संत सयाजी महाराज वर्धा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा डॉ.पंकज भाऊ भोयर वर्धा विधानसभा ह भ प प्रकाश महाराज वाघ मा सो वैशाली येरावार अर्चनाताई वानखेडे मुडे सदाशिव ढाकणे ठाणेदार वर्धा.तसेच समस्त गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज/24 सेलू