मराठा आरक्षण, शिवसेना व सकल मराठा समाजाने फटाके फोडून केले स्वागत..
वर्धा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजात समाविष्ठ करून आरक्षण जाहीर केले. या इतिहासीक निर्णयाचे जिल्हा शिवसेना व सकल मराठा समाजाने एकत्रित येत (दि.२७ जानेवारी) रोजी स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश सराफ, जिल्हाप्रमुख गणेश इखार, सकल मराठा समाजाचे नेते मंगेश चांदुरकर,प्रमोद खंडागळे, संदीप भांडवलकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.यावेळी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्याने आनंद साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मागील सहा महिन्यापासून आंदोलन सुरु होते. त्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्तरूप दिले.मराठा समाजासाठी हा ऐतिहासिक विजय मिळाल्यावर जिल्हा शिवसेना व सकल मराठा समाजाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करत आंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळेस यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष करण्यात आला.
प्रसंगी उपजिल्हा प्रमुख नितीन देशमुख,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, सकल मराठा समाजाचे नेते प्रमोद खंडागळे,संदीप भांडवलकर,मंगेश चांदुरकर, उमाकांत डुकरे,दीपक कदम,अर्चित निघडे,अरुण जगताप,सतीश भांडवलकर,दिलीप म्हस्के,रागिणी गिरमकर,भाग्यश्री निघडे,भारती चांदुरकर, शैलजा साळुंखे,मीनल इंगळे,आशिष जाचक,दिलीप रहाटे, सतीश भांडवलकर,शिवसेनेचे तालुका प्रमुख राहुल चहांदे,शहर प्रमुख अनिकेत जगताप, अमित देवढे,योगेश मुंजेवार,भास्कर नेहारे,राजेंद्र देशमुख,सचिन मांढरे,अमोल माणिकपुरे सहित मराठा समाजाचे कार्यकर्ते व शिवसैनिकांची उपस्थिती होती.
साहसिक न्यूज 24/वर्धा