महाराष्ट्राला भूलथापांचा उपहार देणारा हा अर्थसंकल्प : डॉ. रामदास आंबटकर
अर्थसंकल्प विस्तृत प्रतिक्रिया:
महाराष्ट्राचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अन्याय करणारा त्याचप्रमाणे कुठेही ठोस निर्णय न करता केवळ मागील अर्थसंकल्पातील मुद्दे तसेच मांडणारा हा निराशाजनक अर्थसंकल्प आहे यात विशेष बाब म्हणजे पेट्रोल व डिझेल वरील जीएसटी कमी करण्याच्या ऐवजी वाइन वरील जीएसटी कमी करून सर्वसामान्य जनतेच्या जीवनशैलीला एका विनाशक प्रवृत्तीकडे नेणारे हे अर्थसंकल्प आहे. मागील वर्षातील धडक सिंचन विहिरीचे संपूर्ण पैसे न देता या वर्षी परत धडक सिंचन विहीर इं चे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांच्या मेहेंतीची अक्षरशः चेष्टा केलेली आहे. तसेच वर्धा जिल्ह्यात समवेत विदर्भातील अनेक जिल्ह्यातील निधीअभावी प्रलंभीत असलेले प्रकल्प, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याची संपूर्ण संभावना असते अशा प्रलंबित प्रकल्पांना निधी देण्याऐवजी केवळ पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकडे सढळ हाताने निधी देऊन तराजूच्या एका झोपलेल्या मापाप्रमाणे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे हा अत्यंत निराशाजनक व महाराष्ट्राच्या प्रगतीला थांबा देणारा हा अर्थसंकल्प आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात झालेला महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व महाविकास आघाडीच्या भूलथापांचे अर्थसंकल्प हे जनतेपर्यंत पोहोचल्यावर हा फरक जनतेला स्पष्ट दिसेल.