🔥महाराष्ट्र दिनी पत्रकारांना महसूल विभागाचे दुर्लक्ष; निमंत्रण न मिळाल्याने नाराजी.
प्रतिनिधी,नरेश भार्गव -/ आष्टी तहसील कार्यालयात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 1मे रोजी महाराष्ट्र दिन मोठया उत्सहात साजरा करण्यात आला मात्र — राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा होत असताना, महसूल विभागाकडून स्थानिक पत्रकारांना यंदा निमंत्रण देण्याची विसर झाल्याने तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण झालेला आहे . दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या रिसॉर्ट पत्रिका पत्रकारांना मिळत होत्या परंतु या वर्षी निमंत्रण न मिळाल्यामुळे पत्रकारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाच्या विविध कार्यक्रमांमध्ये पत्रकारांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. शासनाच्या योजना, उपक्रम आणि कार्यक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात माध्यमांची भूमिका निर्णायक असते. मात्र, अशा महत्त्वाच्या दिवशीच पत्रकारांना निमंत्रण न देणे ही गंभीर बाब मानली जात आहे.स्थानिक पत्रकारांनी सांगितले की, यापूर्वीही अनेकदा महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीदेखील यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन पुढील वेळी पत्रकारांना योग्य सन्मान देत निमंत्रण देण्याची मागणी होत आहे. तहसीलदार ऐश्वर्या गिरी ह्या एका वर्षापासून आष्टी तहसील कार्यालयात काम करत असून त्यांची महसूल विभागावर पकड नसल्याने तालुक्यात खनिज उत्खलन व अन्य काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील तलाठी यांनी तहसील कार्यालय थाटला असून 90% तलाठी मुख्यालय राहत नाही भर उन्हात शेतकऱ्यांना अनेक खेड्यातून तलाठी च्या कामाकरिता तहसील कार्यालयात यावे लागतात तसेच मागील दोन महिन्यापासून आष्टी तालुक्यात गॅस सिलेंडर 50 ते 60 दिवस मिळत नसून त्याबाबत तहसीलदारांना तक्रार दिल्या असल्यास सुद्धा आतापर्यंत कोणताही ठोक उपाय केलेला नाही त्या कारणास्तव शहरातील नागरिकांचे तहसीलदारांवर रोस दिसत आहे.दरम्यान, महसूल विभागाच्या या निष्काळजीपणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देणे अपेक्षित असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.