माणिकवाडा ग्रामपंचायत समोर उपसरपंच यांचे आमरण उपोषण.
माणिकवाडा आणि जामगांव येथे स्मशानभूमी व दफनभूमी ला जागा उपलब्ध करून दया
आष्टी शहीद : तालुक्यातील माणिकवाडा ग्रामपंचायत हद्दीत माणिकवाडा व जामगांव ला स्मशान भूमी व दफन भूमी साठी हक्काची जागा नाही.जागा उपलब्ध करून दया यां मागणी साठी माणिकवाडा ग्रामपंचायत चे उपसरपंच अंकित कावळे यांनी ग्रामपंचायत समोर दि.१जानेवारी पासून आमरण उपोषण ला सुरवात झाली.
सविस्तर असें कि,
तिनं हजार लोकसंख्या असलेले गाव माणिकवाडा आहॆ. व याच ग्रामपंचायत च्या कक्षेत जामगांव हे गाव येते. महसूल विभागाकडे सातबारा उपलब्ध आहॆ ते स्मशान भूमी व दफन भूमी ला वळते करा यासाठी सरपंच व उपसरपंच अंकित कावळे यांनी पत्र व्यवहार केला मात्र शासनाने कोणतीही दाखल घेतली नाही.उपसरपंच अंकित कावळे हे दि.१जानेवारी पासून ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले आहे. मागण्या आहॆ १)माणिकवाडा येथे स्मशान भूमी व दफन भूमी साठी जागा उपलब्ध करून द्या.२)जामगांव येथे स्मशान भूमी व दफन भूमी साठी जागा उपलब्ध करून द्या.३)जामगांव येथे बस स्टॉप पासून गावापर्यत पक्का रस्ता मंजूर करा ही मागणी उपोषण कर्त्यांची आहॆ. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहॆ.
नरेश भार्गव साहसिक न्यूज/24 आष्टी शहिद