मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये स्वस्त दरात तिरंगा ध्वज उपलब्ध
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये स्वस्त दरात तिरंगा ध्वज उपलब्ध
साहसिक न्यूज24
मुक्ताईनगर / पंकज तायडे:
भारतीयांकडून “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आप आपल्या घरांवर राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यासाठी आवाहन केले आहे. अभियानाला मुक्ताईनगर येथे प्रोत्साहन मिळावे यासाठी नगरपंचायत मुक्ताईनगर प्रशासनाने कंबर कसली असून नागरिकांना यांनी राष्ट्रीय ध्वज केवळ 21 रुपयामध्ये उपलब्ध केला आहे. या ध्वजाची साईज 20 x 30 इंच आहे. यासाठी पालिकेत एक अर्ज भरून घेतला जाणार असून घरावर तिरंगा ध्वज लावणाऱ्या नागरिकांची नोंद घेतली जाणार आहे. तिरंगा केवळ 21 रुपयामध्ये पालिकेत उपलब्ध झाल्याचे व तो आधार कार्ड झेरॉक्स व एक अर्ज भरून घेवून जाण्याचे आवाहन मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांनी केले आहे