मुरादपुर शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा:१० आरोपी ताब्यात ७लाख २८ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल जप्त.
हिंगणघाट,समुद्रपुर : पोलिसांनी मुरादपुर शिवारात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धाड टाकून याठिकाणी जुगार खेळत असलेल्या १० आरोपी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ७ लाख २८ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.प्राप्त माहितीनुसार १५ जानेवारी सायकांळच्या सुमारास समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर यांना मुरादपुर शेत शिवारात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह मुरादपुर शेत शिवारात जाऊन पाहणी केली असता याठिकाणी खुल्या जागेवर श्रीकृष्णा बबनराव राउत वय 33 वर्ष रा. समुद्रपुर , पांडुरंग रामाजी फलके वय 41 वर्ष रा. धगडबन, जंयत धनजय धोटे वय 43 वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट,सुनिल विठ्ठलराव वरघणे वय 37 वर्ष रा. अल्लीपुर श्रीकांत शरद ढोमणे वय 24 वर्ष रा. अल्लीपुर ,श्रीराम बबनराव राउत वय 38 वर्ष रा. समुद्रपूर,शत्रुघ्न चंपतराव वलके वय 40 वर्ष रा. मुरादपूर, शैलेश प्रमोद घोडे वय 30 वर्ष रा. येरणवाडी, विनोद रमेशराव ढगे वय 27 वर्ष रा. अल्लीपूर, पंकज विठ्ठलराव देवतारे वय 36 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वार्ड हिगंणघाट या सर्व जुगार खेळताना रंग हाथ आढळून आले यावेळी पोलिसांनी या सर्वांच्या ताब्यातून नगदीसह ७ लाख २८ हजार ८५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून १० आरोपी विरोधात समुद्रपुर पोलिस ठाण्यात जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेगावकर सह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.
ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज / 24 हिंगणघाट