मोफत महीला आरोग्य शिबिर संपन्न.
हेमके गुरुजी प्रतिष्ठानचा उपक्रम
वर्धा – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अंध विद्यालय नालवाडी येथे दे सी हेमके गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नारायण निकम, उद्घाटक डॉ.सचिन पावडे तर प्रमुख अतिथी म्हणून हेमके गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहासिनी हेमके,सचिव अजय भोयर, शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा उषा फाले, अरविंद हेमके उपस्थित होते.तपासणी करीता निरामय हॉस्पिटल नागपूरच्या संचालिका स्त्री रोग तज्ञ डाॅ.ऋचा सानप_ चांगले, डॉ. हंसा लांजेवार यांनी परिश्रम घेतले.
आरोग्याच्या दृष्टीने एक पाऊल स्त्रियांना होणाऱ्या रोगापासून बचावासाठी हे ध्येय ठेवून डॉ. किशोर सानप यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ह्या मोफत महीला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांना आरोग्य विषयक तपासणी करून आवश्यक ते औषधोपचार यावेळी करण्यात आले, जवळपास 90 महिलांनी ह्या मोफत शिबिराचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे संचालन राजीव धात्रक, प्रास्ताविक व आभार सचिव अजय भोयर यांनी केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी संजय बारी, स्वप्निल मानकर, ज्योती लोखंडे ,दिपाली परमार, सोनाली भोयर ,सारिका जावरकर, सुषमा माहुरले ,अश्विनी सानुलकर, सविता किटकुले ,अर्चना बालमवार, राकेश सरोदे मोनिका साळवे, सागर घाटे आदींनी परिश्रम घेतले.
साहसिक न्यूज /24 वर्धा