मोबाईल टॉवरचे त्वरित काम थांबवा…

0

साहसिक न्यूज24
सागर झोरे /देवळी:
देवळी शहरात वार्ड क्रमांक आठ मध्ये,जामा मजीतच्या मागे आशिष तिमांडे यांच्या घरी मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरु झाल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी यावर आक्षेप घेतले आहे.मोबाईल टावर च्या उत्सर्जित किरणांमुळे होणाऱ्या रोगराईपासून तसेच हा वस्तीचा मध्य भाग असल्यामुळे तेथे येणाऱ्या जाणाऱ्यांचे जीवालाही धोका उद्भवू शकतो तसेच लहान रस्ते असल्यामुळे तेथे मोठे वाहन येत जात नाही त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते असे त्या भागातील नागरिकांचे म्हणणे आहेत.तसेच देवळी नगरपरिषद मध्ये या मोबाईल टॉवर च्या बांधकामाच्या परवानगी विषयी विचारले असता नगर परिषद चे नगर रचनाकार प्रणव हेडाऊ यांनी सांगितले की आमच्याकडे मोबाईल टॉवर कंपनीचा बांधकामा च्या परवानगी संबंधित अर्ज प्राप्त झालेला आहे.परंतु देवळी नगरपरिषदेने त्यांना मोबाईल टावर कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली नाही असे त्यांनी सांगितले.
कोणतेही बांधकाम परवानगी नसताना मोबाईल टावर कंपनीने बांधकाम कसे सुरु केले या अवैध बांधकामास नगर परिषद ने त्वरित थांबवावे असे शहर संयोजक संजय कामडी त्यांनी म्हटले आहे यांनी सांगितले आहे. जर नगरपरिषद ने या अवैद्य बांधकामास त्वरित थांबविले नाही तर आम्ही जन आंदोलन करू असा इशारा बजरंग दल विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी दिला यावेळी निवेदन देतांना मोहन जोशी,गोल्डी बग्गा, गणेश शेंडे अमोल फटिंग,प्रकाश कामडी,भरत येळणे, अशोक कलोडे, प्रभाकर येळणे, दिलीप तडस, आदी लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!