विद्युत झटक्याने दोन माकडांचा मृत्यू…

0

साहसिक न्यूज24
सागर झोरे / देवळी:
देवळी शहरात सुरू असलेल्या सतत पावसामुळे माकडांचे कळप आता गावाकडे येऊ लागले आहे.त्यामुळे देवळीकर नागरिक त्रस्त झालेले दिसत आहे.रविवारी सायंकाळी पाच वाजता एक माकडांचा कळप पोलीस स्टेशनच्या झाडावरती बसला होता त्या कळपातील एक माकडाचे पिल्लू खेळत खेळत पोलीस स्टेशनच्या भिंतीकाठी असलेल्या विद्युत डीपी वर चढला विद्युत डीपी वर विद्युत प्रवाह सुरु असलेला तार पकडल्यामुळे डीपीवर विस्पोट झाले आणि माकडांचे पिल्लू तिथेच चिपकले विस्फोटच्या आवाजाने झाडावरचे माकडे सैरावैर पळू लागली पडू लागलेल्या माकडांच्या कळपातून एक माकड पिल्लू काढण्यासाठी डीपीवर गेला त्याने पिलाला स्पर्श करताच त्या माकडाला ही जबरदस्त विद्युत झटका लागल्यामुळे तो माकडही खाली कोसळला आणि गतप्राण झाला.
विस्फोटाचे आवाज ऐकून परिसरातील नागरिक तथा व्यवसायिक जमा झाले तिथे मोठी गर्दी उसळली गर्दी पाहून तिथे लगेच पोलीस आले असता पोलिसांनी विद्युत विभागाला सूचना देऊन तिथे बोलाविले विद्युत विभागाने त्या भागातील लाईन बंद करून चिपकलेल्या माकडाच्या पिलाला काढले या घटनेने त्या परिसरात लोकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!