वेदांत चौधरी ब्लॅक बेल्ट पदवीने सन्मानित…

0

क्रिडा क्षेत्राच्या माध्यमातून घडते व्यक्तिमत्व,सुरज गोहाड.

वर्धा / साहस आत्मनिर्भरता व आत्मविश्वास बालवयापासून मुला-मुलींना निर्माण करणाऱ्या प्रशिक्षणाची गरज असते शालेय शिक्षणातून बुध्दीचा विकास होत असते पण बुध्दीसोबतच शारिरिक विकासाची गरज असते.कराटे प्रशिक्षणातून आत्मविश्वास निर्माण होतो. शिक्षणासोबत क्रिडा क्षेत्राच्या माध्यमाने व्यक्तिमत्व सहज घडविता येते.वेदांत चौधरी यांनी आपल्या अथक परिश्रमाने ब्लॅक बेल्ट पदवी प्राप्त केली आपल्या या प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू शिक्षणासोबतच खेळामध्येही प्रगती साधत आहेत ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानस्पद आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद वर्धेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी सुरज गोहाड यांनी व्यक्त केले.
ते शहीद हुतात्मा स्मारक येथे कराटे मार्शल आर्ट असोसिएशन व लॉयन्स ट्रेडिशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे सदस्य सहयोगी प्रशिक्षक वेदांत चौधरी यांना ब्लॅक बेल्ट पदवीने सन्मानित करतांना बोलत होते.
तसेच यावेळी मंचावर लॉयन्स क्लॅबचे अध्यक्ष विजय सत्यम, उपाध्यक्ष संजय महाकाळकर, निम्न वर्धा प्रकल्पाचे उप-कार्यकारी अभियंता अमोल आठवले,ऑल इंडिया शास्त्री फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही,राजेश धोपटे,कोशी उल्हास वाघ,अजय गुल्हाने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
वेदांत चौधरी यांनी आपले यशाचे श्रेय गुरू कोशी उल्हास वाघ यांना दिले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सेन्साई साहील वाघ, सेन्साई अमोल मानकर, हर्षाली चौधरी, संग्राम मोहीते, राघव दोडके, स्वाती झेडे. आदींनी अथक परिश्रम घेतले.
वेदांत चौधरी यांना ब्लैक बेल्ट मिळाल्याबद्दल त्यांचे जेष्ठ समाजसेवी मोहनबाबू अग्रवाल अॅड. विजयसिंह ठाकूर, अॅड. असद खान पटेल, डॉ. प्रदिप कश्यप, अॅड. सुनील चौधरी, अॅड. इब्राहिम बख्श आझाद, अहसान राही आदी अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

साहसिक न्यूज /24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!