शासन प्रशासनाच्या निर्णयाने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर 

0

🔥शासन प्रशासनाच्या निर्णयाने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर 

🔥विहीर खोलीकरण व बोरवेल वर बंदी घातल्याने शेतकरी अडचणीत 

(साहूर, प्रतिनिधी शरद वरकड)-/ वर्धा जिल्ह्यामध्ये विहीर खोलीकरण व बोरवेल वर बंदी घातल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी च्या बागा तयार केल्या असून अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यांना मोठे केले आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे बागांचे पालन पोषण केले मात्र यावर्षी पावसाळा कमी झाल्याने दुष्काळ स्थिती निर्माण झाली त्यामुळे बागांना वाचवण्याकरिता पाण्याची अत्यंत आवश्यकता असून विहिरींना पाणी करणे गरजेचे आहे तसेच बोरवेल करणे सुद्धा महत्त्वाचे आहे परंतु शासनाच्या व प्रशासनाच्या निर्णयामुळे शेतकरी विहिरींचे खोलीकरण करू शकत नाही आणि बोरवेल सुद्धा करू शकत नाही त्यामुळे विहिरींना पाणी नाही म्हणून पूर्ण फळबागा वाचवणे कठीण झालेले आहेत डोळ्यासमोर फळबागा नष्ट होत असल्याने शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला आहे जमिनीत पाणी असतांनीसुद्धा शासनाने यावर बंदी घातली असल्याने शेतकऱ्यांचा रोष अनावर झालेला असून काही दिवसाआधी आष्टी तालुक्याच्या वतीने आष्टी तहसील कार्यालयात तहसीलदार यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेले होते त्यावेळी तहसीलदार गिरी मॅडम यांनी सांगितले की आम्हाला जिवंत लोकांना व जनावरांना प्रथम वाचवायचे आहे नंतर त्यामुळे आम्ही विहिरींचे खोदकाम व बोरवेल साठी परवानगी देऊ शकत नाही असे सांगितले त्यावर शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिउत्तर दिले की जर आमचा प्राण वाचवायचा असेल तर सुरुवातीला ज्याच्यावर आमचा प्राण अवलंबून आहे तो जर वाचला नाही तर आम्ही सुद्धा वाचणार नाही अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी सुद्धा दिली होती तसेच वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार अमर भाऊ काळे व आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमित भाऊ वानखडे यांच्यासमोर सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या परंतु आतापर्यंत बंदी मात्र उठली नसून शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहेत त्यामुळे आता शेतकरी टोकाचे पाऊल उचलणार असून जिल्हाधिकार्यालया सामोर मोठे आंदोलन करण्याच्या विचारात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहेत जमीन आमची विहिरी आमच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या श्रोतापासून कितीतरी दूर आमच्या शेती तरीही आम्हाला खोदकाम करू देत नसल्याने आमच्या फळबागा नष्ट होताना आम्हाला दिसत आहे त्यामुळे आम्ही टोकाचे पाऊल उचलणार असून याला जबाबदार शासन प्रशासन असणार असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलेले आहेत जर यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये यावर स्थगिती येऊ शकते तर वर्धा जिल्ह्यामध्ये यावर स्थगिती का आणत नाही हा प्रश्न शेतकरी विचारत आहे फक्त संत्रा मोसंबीच्या बागा नसून कापूस तूर चना गहू ह्या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे म्हणून शासनाने व प्रशासनाने यावर स्थगिती आणून विहिरीचे खोदकाम व बोरवेल करण्याकरता परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे हे विशेष

 🔥मी साहूर येथील शेतकरी असून माझ्याजवळ पाच एकरामध्ये मोसंबीचे झाडे आहेत परंतु माझ्या विहिरीचे पाणी फक्त एक तास चालते त्यामुळे खोदकाम केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नाही जर मला खोदकाम करायला परवानगी मिळाली नाही तर माझे सर्व मोसंबीचे झाडे नष्ट होईल याला जबाबदार फक्त शासन आणि प्रशासन राहील तसेच मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही म्हणून शासनाच्या वतीने यावरील बंदी लवकरात लवकर उठवावी ही हात जोडून नम्र विनंती करतो(निलेश परिमळ शेतकरी साहूर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!